Viral Video: या अभिनेत्याचा राग पुन्हा अनावर! सगळयांसमोर फॅनला 'थप्पड'

 सेल्फी घेऊ इच्छिणार्‍या एका फॅनला साऊथचा अ‍ॅक्टर नंदमुरी बालकृष्ण यांनी थप्पड मारल्याचा एक व्हिडिओ आजकाल झपाट्याने व्हायरल होत आहे. 

Updated: Aug 17, 2017, 03:28 PM IST
Viral Video: या अभिनेत्याचा राग पुन्हा अनावर! सगळयांसमोर फॅनला 'थप्पड'  title=
फोटो- @Followkhiren

हैद्राबाद :  सेल्फी घेऊ इच्छिणार्‍या एका फॅनला साऊथचा अ‍ॅक्टर नंदमुरी बालकृष्ण यांनी थप्पड मारल्याचा एक व्हिडिओ  झपाट्याने व्हायरल होत आहे. 

इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ बुधवार  रात्रीचा आहे असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओत नंदमुरी बालकृष्ण रागात असल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी ते हैदराबाद पासून २०० किमी आतमध्ये नंदगाय  येथे गेले होते. 

 

बालकृष्ण यांनी कोणावर हात उचलण्याचा हा पहिलाच प्रकार नव्हे. ऑगस्ट महिन्यातच बालकृष्ण यांनी तेलगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका सहायकालाही थप्पड मारली होती. तसेच त्याला शूजची लेस बांधायला सांगितले होते. या संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला होता. बालकृष्ण त्यांनी त्यांच्या  करिअरमधील १०२ वा चित्रपट याच महिन्यात शूट करायला घेतला आहे. पण या चित्रपटाचे नाव अजूनही ठरलेले नाही.