तेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली?

जान्हवी शशांकबद्दल असं काही बोलली की...

तेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली?  title=

मुंबई : श्री आणि जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही मालिका विश्वातील अतिशय लोकप्रिय जोडी. होणार सून मी या घरची या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणि या मालिकेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत एकमेकांचे साथीदार असलेले हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती बनले.  8 फेब्रुवारी 2014 मध्ये शशांक आणि तेजश्रीने पुण्यात लग्न केलं होतं. 

शशांक आणि तेजश्री छोट्या पडद्यावरची जोडी

मात्र अवघ्या एका वर्षातच या दोघांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला. अवघ्या एका वर्षातच दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चाहते भरपूर नाराज होते. शशांक आणि तेजश्रीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर उचलून धरलं होतं. यानंतर शशांक केतकरने एप्रिल 2017 मध्ये दुसरा विवाह केला आहे. शशांकने पेश्याने वकील असलेल्या प्रियंका ढवळेसोबत लग्न केलं आहे. 

काय म्हणाली तेजश्री प्रधान? 

पण या लग्नामुळे तेजश्री प्रधानला नेमकं काय वाटलं हे तिने रेडिओ सिटीच्या एका मुलाखतीत शेअर केलं आहे. दुसऱ्या लग्नाच्यावेळी शशांक केतकरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. याबाबत तेजश्रीला विचारण्यात आलं तेव्हा तीने ही गोष्ट नक्कीच खेदजनक असल्याच म्हटलं आहे. कारण शशांक आणि मी आम्ही दोघांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे आता तो त्याच्या पुढील आयुष्याचा विचार करू शकतो. अशावेळी सोशल मीडियावर लोक ट्रोल करतात तेव्हा नक्कीच वाईट वाटतं. 

होणार सून मी या घरची 

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही जोडी मंदार देवस्थळी यांची मालिका होणार सून मी या घरची मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आणि याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्रीच्या जवळीक वाढली. आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षक खूप खूष होते. या दोघांच्या लग्नाला मालिकेतील सहाही सासू उपस्थित होत्या.