मालिका विश्वाचा त्याग करत कृष्णभक्तीत आयुष्य वाहणारी अभिनेत्री आता ओळखूही येत नाही

कृष्णभक्तीत तल्लीन असणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही पाहिलं?   

Updated: Jul 1, 2022, 11:25 AM IST
मालिका विश्वाचा त्याग करत कृष्णभक्तीत आयुष्य वाहणारी अभिनेत्री आता ओळखूही येत नाही  title=
television actress Anagha Bhosale non recognisable post dedicating her life to lord krishna

मुंबई : कलाविश्वाचा अनेकांनाच हेवा वाटतो. यामागची कारणं अनेक असतात. कुणाला कलाकारांचं आयुष्य भारावून टाकतं. कुणाला त्यांना मिळणारं मानधन थक्क करतं. कुणासाठी त्यांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी आश्चर्यचकित करुन जाते. प्रत्येकासाठी या क्षेत्राबद्दल कुतूहल वाटण्याचे मुद्दे तितकेच वेगळे आणि नवे. पण याला काही व्यक्ती अपवादही आहेत. 

या अशा व्यक्ती आहेत ज्यांनी या विश्वाशी एकरुप झालेलं असतानाही त्यातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री अनघा भोसलेचं. 'अनुपमा' या मालिकेमध्ये नंदिनीची व्यक्तीरेखा साकारणारी अनघा आता मात्र या कलाजगतापासून फार दूर गेली आहे. (Anagha Bhosale)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती जरी चाहते आणि फॉलोअर्सच्या संपर्कात असली तरीही इथं तिचं पूर्णपणे बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. अनघानं स्वत:ला कृष्णभक्तीत वाहिलं आहे. (television actress Anagha Bhosale non recognisable post dedicating her life to lord krishna)

कृष्णाच्या सेवेत तल्लिन असताना ती सृष्टीतील प्रत्येक सजीवावर प्रेम करण्याची शिकवण सर्वांना देत आहे. जीवनात समाधान आणि आनंदाच्या वळणावर पोहोचण्यासाठीचे काही सोपे उपाय ती सांगताना दिसत आहे. 

अनघानं जेव्हापासून अध्यात्माच्या मार्गाची निवड केली, त्या क्षणापासून तिच्या राहणीमानातही बरेच बदल झाले आहेत. सौम्य रंगांचे कपडे, कपाळावर कृष्णभक्तीचा टिळा, गळात तुळशीमाळ, हातात जपमाळ आणि चेहऱ्यावर प्रसन्नमुद्रा असं तिचं रुप पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिच्यामध्ये झालेला हा बदल अनेकांना थक्क करुन जात आहे.