साराच्या आयुष्यातील ती खास गोष्ट, आई नाही फक्त जान्हवी समजू शकते

साराच्या आयुष्यात कोणती खास गोष्ट आहे, जी तिची आई नाही तर फक्त जान्हवी समजू शकते?  

Updated: Dec 5, 2021, 12:35 PM IST
साराच्या आयुष्यातील ती खास गोष्ट, आई नाही फक्त जान्हवी समजू शकते

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सारा तिच्या आगामी 'अतरंगी रे' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सारा सिनेमाचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे. नुकताचं झालेल्या एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात देखील सारा पोहोचली. यावेळी साराने तिच्या आयुष्यातील अशी एक गोष्ट सांगितली, जी फक्त जान्हवी आणि अनन्या समजू शकते. 

यावेळी साराने अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेसोबत असणाऱ्या नात्याबद्दल सांगितलं. सारा, जान्हवी आणि अनन्या यांच्यात एक खास नातं आहे. तिघींनी देखील एकाच वेळी अभिनयाला सुरूवात केली. पण कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे गोष्टी ठरवल्या प्रमाणे होवू शकल्या नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे सारा म्हणाली काही गोष्टी आई नाही पण अनन्या आणि जान्हवी चांगल्या प्रकारे समजू शकतात. करियरमध्ये आलेल्या या अडचणी आई अमृता सिंग पेक्षा जान्हवी आणि अनन्या चांगल्या प्रकारे समजू शकतात. महत्त्वाचं म्हणजे साराचे आई-वडील देखील कलाकार आहेत. त्यामुळे चांगला कलाकार कसा असला पाहिजे?  याचं मार्गदर्शन साराने आई वडिलांकडून घेतलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा म्हणाली, 'माझे आई-वडील कलाविश्वातील आहेत. मी पूर्वी दोघांकडून अभिनयाबद्दल सल्ला घ्यायची. माझे आई-वडील सांगायचे सिनेमा फक्त 2 तासांचा असतो. पण सिनेमाची कथा तयार करण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळ लागतो. त्यामुळे रोज उठल्यानंतर सिनेमातील रस होत असेल तर तो सिनेमा न केलेला कधीही उत्तम...'