Varun Dhawan ची पत्नी Natasha Dalal कडे 'गुडन्यूज'

वरूण आणि नताशाच्या आयुष्यात लवकरचं येणार 'गुडन्यूज', प्रेक्षकांसोबत करतील शेअर  

Updated: Dec 5, 2021, 11:36 AM IST
Varun Dhawan ची पत्नी Natasha Dalal कडे 'गुडन्यूज'

मुंबई : अभिनेता वरूण धवन कायम त्याचं खासगी आयुष्य गुपित ठेवतो. जानेवारी 2021साली वरूणने लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केलं आहे. पण त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा कधीचं झाली नाही. नताशा आणि वरूण यांना अनेकदा पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. लग्नानंतर देखील दोघे एकत्र क्लालिटी टाईम घालावताना दिसतात. यादरम्यानचे फोटोही हे कपल सोशल मीडियावर शेअर करतात.

आता धवन यांच्या आयुष्यात नवा ट्विस्ट येणार आहे. नताशा दलाल सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. आता ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. नताशा दलाल फॅशन डिझायनिंगशी संबंधित एका शोमध्ये दिसणार आहे. या शोचे नाव 'येस टू द ड्रेस इंडिया' आहे. शो  पूर्णपणे फॅशन आधारित असेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या शोद्वारे ती नववधूसाठी वेडिंग ड्रेस डिझाइन करताना दिसणार आहे. तसेच या शोमध्ये नताशा दलालही पहिल्यांदाच तिचे वेडिंग कलेक्शन दाखवताना दिसणार आहे. हा शो Discovery+ वर दाखवला जाईल. सध्या सर्वत्र तिच्या फॅशनची चर्चा आहे. 

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा 2020 सालापासून पाहायला मिळत होती. जानेवारी 2021 रोजी दोघांनी खास लोकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. या लग्नात काही बॉलिवूड स्टार्सही सहभागी झाले होते. वरुण-नताशाबद्दल बोलायचे झाले तर दोघेही बालपणीचे मित्र आहेत.