बॉलिवूडमध्ये 'या' सोज्वळ अभिनेत्रींच्या Dirty Picture ची चर्चा, नावं ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये सहसा अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसाठी, सौंदर्यासाठी किंवा मग त्यांच्या एखाद्या वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. पण, एका अभिनेत्रीनं मात्र तिच्या डर्टी पिक्चरमुळंच सर्वांच्या नजरा रोखल्या. ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. 

Updated: Aug 17, 2022, 02:45 PM IST
बॉलिवूडमध्ये 'या' सोज्वळ अभिनेत्रींच्या Dirty Picture ची चर्चा, नावं ऐकून व्हाल थक्क  title=
The Dirty Picture sequal Vidya Balan will replaced by actress taapsee pannu

मुंबई : बॉलिवूडमध्ये सहसा अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसाठी, सौंदर्यासाठी किंवा मग त्यांच्या एखाद्या वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. पण, एका अभिनेत्रीनं मात्र तिच्या डर्टी पिक्चरमुळंच सर्वांच्या नजरा रोखल्या. ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. 

दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या 'द डर्टी पिक्चर' (The Dirty Picture) या चित्रपटात विद्या मध्यवर्ती भूमिकेत झळकली होती. नसिरुद्दीन शाह, इमरान हाश्मी आणि तुषार कपूर यांच्यासोबत तिनं चित्रपटाच स्क्रीन शेअर केली होती. 

(Vidya Balan) विद्याच्या या भूमिकेला आणि परिणामी या चित्रपटाला कमाल प्रसिद्धी मिळाली. ज्यानंतर आता म्हणे या चित्रपटाच्या सिक्वलची तयारीही सुरु झाली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पूर्णपणे वेगळं कथानक साकारलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

क्रिती सेनन किंवा (Tapasee Pannu) तापसी पन्नू या सहसा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारू शकतात. पण, विद्या मात्र या चित्रपटाचा भाग नसेल हे आता स्पष्ट झालं आहे. 

From Vidya Balan to Sushant Singh Rajput, actors who made their debut with  Zee

2023 मधील पहिल्या तीन महिन्यांतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटात कंगनाला मध्यवर्ती भूमिकेसाठी प्राधान्यस्थानी ठेवण्यात आलं होतं. पण, तिनं हा प्रस्ताव नाकारल्यामुळं आता बॉलिवूडमध्ये क्रिती आणि तापसीच्या 'द डर्टी पिक्चर' (The Dirty Picture) ' कमाल चर्चा पाहायला मिळत आहे.