The Kapil Sharma Show फेम अभिनेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

जगाला दुःख विसरून हसायला शिकवणाऱ्या अभिनेत्याकडून मोठं पाऊल..  

Updated: Jan 7, 2022, 09:36 AM IST
The Kapil Sharma Show फेम अभिनेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'ने कायम प्रेक्षकांना भरभरून हसायला शिकवलं. पण आता जगातील अनेक लोकांना दुःख विसरून हसायला शिकवणाऱ्या 'द कपिल शर्मा शो'मधील एका अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण नशीब बलवत्तर असल्यामुळे अभिनेत्याचा जीव वाचला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या अभिनेत्याचं नाव आहे, तीर्थानंद. तीर्थानंदला अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने देखील म्हणून देखील ओळखलं जातं.

रिपोर्ट्सनुसार, तीर्थानंदने 27 डिसेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटना समजताच तीर्थानंदच्या शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. योग्य वेळी उपचार मिळाल्याने अभिनेत्याचे प्राण वाचले आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. 

आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तीर्थानंदने एका टीव्ही वाहिनीला सांगितलं की, आर्थिक आणि कुटुंबातील अडचणींमुळे त्याने विष पिण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाही तर वाईट वेळी त्याला कुटुंबाने देखील  एकटं सोडलं. 

रुग्णालयातही त्याला कोणी भेटायला आलं नाही. तीर्थानंदने शेवटी सांगितले की, तो सध्या कर्जबाजारी झाला आहे आणि पत्नी आणि मुलीच्या संपर्कात नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x