मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. लग्नानंतर तर प्रियंकाची स्टाईल आणखी चर्चेत आली. मात्र कधी कधी प्रियंका एक्सपेरिमेंट करणं चांगलच भारी पडलंय. चक्क अती बोल्डकडे गेलेला हा ड्रेस चर्चेचा विषय बनला आहे. डिनर डेटला प्रियंकाने इतका बोल्ड ड्रेस घातला होता की, तिला हतबल झाल्यासारखं झालं.
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)अनेकदा तिच्या उत्कृष्ट स्टाईलसाठी ओळखली जाते. तिची प्रत्येक फॅशन वेगळी आणि शानदार असते. अभिनेत्रीचा लूक समोर येताच तो व्हायरल होतो. पण कधी-कधी अधिक स्टायलिश दिसण्याच्या नादात ती oops moment लाही बळी पडते. असाच प्रकार प्रियंकासोबत झाला. जेव्हा ती पती निक जोनाससोबत डिनरला आली होती आणि यावेळी तिच्या ड्रेसने तिचा विश्वासघात केला. अतिशय बोल्ड असलेला हा ड्रेस ट्रान्सपरंट होता.
प्रियंका चोप्राला तिच्या पतीसोबत डिनर पार्टीला जायचे होते आणि तिथे जाण्यासाठी तिने निवडलेला ड्रेस खूपच ट्रान्सपरंट होता. प्रियांकाच्या या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोल देखील केले गेले. त्याचे कारण म्हणजे ड्रेसचा पारदर्शक लूक.
प्रियंकाने घातलेल्या ड्रेसच्या वर एक साधा ब्लॅक स्लीव्हलेस टॉप होता. पण ड्रेसच्या तळाशी, हिरव्या आणि काळ्या रंगात प्रिंटेट फुलांच्या पॅटर्नसह काळ्या रंगात एक पारदर्शक स्कर्ट होता.
प्रियंका ती जे काही घालते ते पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी करते, परंतु पेहरावाच्या पारदर्शकतेमुळे प्रियांका अनेक छायाचित्रांमध्ये खूपच अस्वस्थ दिसली. मात्र, यावेळी प्रियांकाच्या हिरव्या अगदी छोट्याशा बॅगने तिला खूप साथ दिली. तिला Oops Moment चा बळी होण्यापासून वाचवले.