मुंबई : 'घूमर' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय.'घुमर'च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक आर. बाल्की आणि अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका "घूमर" मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटाच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.
या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येतं आणि जेव्हा तो दिव्यांग खेळाडूला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. पुन्हा एकदा र्दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.
अभिषेक आणि सैयामीचे दमदार परफॉर्मन्स त्यांच्या मनातील वेदना, खेळासाठी दृढनिश्चय आणि आशा अनेक लक्षवेधी क्षणाची पर्वणी यातून अनुभवयाला मिळणार असून दिग्दर्शक आर. बाल्की यांची अनोख्या शैलीतून 'घुमर' ची कथा गुंफली गेली आहे.
'घूमर'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. 'घूमर' हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी 'चीनी कम', 'पा', आणि 'पॅड मॅन' सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
'घूमर' मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत दिसणार असून शबाना आझमी आणि अंगद बेदीदेखील यात अनोख्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात एक ट्विस्ट म्हणून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची खास एंट्री असणार आहे. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण होत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित "घूमर" 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी ट्विट करत सांगितलं की, त्याच्या आगामी चित्रपट घूमरचा ट्रेलर 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार नाही. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाच्या वृत्तानंतर हा निर्णय त्याने घेतला आहे. अभिनेत्याने त्याचा निर्णय दिवंगत लगानचे कला दिग्दर्शकासाठी 'आदर चिन्ह' असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्याच्या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती.