झी मराठीवरील 3 लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Aug 2, 2021, 01:13 PM IST
झी मराठीवरील 3 लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

मुंबई : झी मराठी आणि प्रेक्षकांचं अतुट असं नातं आहे. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेतील कथा आणि पात्र यांच्याशी प्रेक्षक एकरूप होतात. मालिका संपणार किंवा प्रेक्षकांचा निरोप घेणार हे चाहत्यांना सहजा सहजी रुचत नाही. अशाच झी मराठीवरील 3 लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. 

झी मराठी कायमच नात्याचा गोडवा राखत असते. त्यामुळे प्रत्येक मालिकेशी प्रेक्षक जोडला जातो. नवनव्या मालिका प्रेक्षकांसाठी आणण्याचं सातत्य झी ने राखलं आहे. मालिकेची उत्सुकता असतानाच त्याचा निरोप घेणं हे झी मराठीचं वेगळेपण. आता देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेल्या तीन मालिका निरोप घेत आहेत. 

या तीन मालिका घेणार निरोप

यामध्ये 'देवमाणूस', 'अग्गबाई सूनबाई' आणि 'कारभारी लयभारी' या तीन मालिका बंद होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत या तिन्ही मालिका निरोप घेणार आहे. या तिन्ही मालिका वेगळ्या धाटणीच्या होत्या. या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच. पण त्यासोबत समाजात सकारात्मक बदल घडवण्यात हातभार लावला. 

या चार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

या तिन्ही मालिकांच्या जागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ','मन झालं बाजिंद',  'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' आणि 'ती परत आलीये' या चार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नवी मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' २३ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री. ८:३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

बाजिंद्या रंगाचं आभाळ पांघरून घेतो मी !! नवी मालिका 'मन झालं बाजिंद' २३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या ७ वा.

तयारी स्पर्धा परिक्षेची नव्हे तयारी संसाराची...!! नवी मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ३० ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री ९ वा.

पाय कोणाचे, घुंगरू भलत्याचे... नवी मालिका 'ती परत आलीये' १६ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा.