बहिणीसोबत दिसणारी ही दोन मुलं होती बॉलिवूडचे सुपरस्टार, तुम्ही ओळखलत का?

सध्या सोशल मीडियार सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो शेअर करुन त्यांना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं.  

Updated: Aug 2, 2022, 10:47 PM IST
बहिणीसोबत दिसणारी ही दोन मुलं होती बॉलिवूडचे सुपरस्टार, तुम्ही ओळखलत का? title=

Celebs Photo Challenge : सध्या सोशल मीडियार सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो शेअर करुन त्यांना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तीन मुलं दिसत आहेत. फोटोत तीन भावंड दिसत आहेत. बहीण मध्यभागी बसली आहे. तर मोठा भाऊ बहिणीला पाहत आहे, तर लहान भावाच्या हातात दिसत आहे. तिन्ही मुलं खूप गोंडस आहेत.  हा क्यूट फोटो चाहत्यांची मनं जिंकत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही तिन्ही मुलं बॉलिवूडच्या शो मॅनची मुलं आहेत. त्यांचं कुटुंब खूप मोठे आहे आणि प्रत्येक पिढीमध्ये त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी चित्रपटांमध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाने बॉलिवूडला खूप काही दिलं आहे.

कदाचित तुम्ही या मुलांना आत्तापर्यंत ओळखलं असेल आणि ज्यांनी त्यांना अद्याप ओळखलं नाही त्यांना सांगणार आहोत की, ही राज कपूर यांची मुलं आहेत ज्यांना बॉलिवूडचा शो मॅन म्हटलं जातं. सर्वात लहान ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि त्यांची मोठी बहीण रितू नंदा फोटोमध्ये दिसत आहेत. फोटोत तिघंही खूप क्यूट दिसत आहेत. दोन्ही मुलं मोठी होऊन बॉलिवूडचे मोठे कलाकार बनले.

मात्र, यातील दोन मुलं आता या जगात नाहीत. रितू नंदा एक व्यावसायिक आणि विमा सल्लागार होत्या. निखिल नंदा, नताशा नंदा ही त्यांची मुलं आहेत. तर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ही त्यांची सून आहे. त्याचवेळी त्यांचा नातू अगस्त्य नंदा द आर्चीजमधून पदार्पण करत आहे. तर नात नताशा नंदाला व्यवसायात रस आहे. रितू यांनी 14 जानेवारी 2020 रोजी जगाचा निरोप घेतला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर, फोटोमध्ये दिसणारा मोठा मुलगा म्हणजेच रणधीर कपूर त्यांच्या काळात मोठे स्टार होते. रणधीर कपूर यांन अभिनेत्री बबितासोबत लग्न केलं. त्यांना करिश्मा आणि करीना कपूर या दोन मुली आहेत. या दोघंही अभिनेत्री आहेत.