तिसर्‍या दिवशीही 'बागी 2' ने केली बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी  या जोडीचा ' बागी 2' या शुक्रवारी रिलिज झाला. पहिल्या दिवसांपासूनच या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कमाल करायला सुरूवात केली आहे. 'पद्मावत' नंतर यंदाच्या वर्षातील सगळ्यात मोठं ओपनिंग या चित्रपटाला मिळालं आहे. 

Updated: Apr 2, 2018, 10:52 AM IST
तिसर्‍या दिवशीही 'बागी 2' ने केली बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी  title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी  या जोडीचा ' बागी 2' या शुक्रवारी रिलिज झाला. पहिल्या दिवसांपासूनच या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कमाल करायला सुरूवात केली आहे. 'पद्मावत' नंतर यंदाच्या वर्षातील सगळ्यात मोठं ओपनिंग या चित्रपटाला मिळालं आहे. 

बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी 

बागी 2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25 कोटी, दुसर्‍या दिवशी 22 कोटी आणि तिसर्‍या दिवशी 28 कोटींची कमाई केली आहे. 

ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या चित्रपटाने सुमारे 28 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत 'बागी 2' ने 75 कोटींचा गल्ला जमवला आहे. टायगर श्रॉफच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सने अनेक चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.'बागी 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. 

 

 काय आहे चित्रपटाची स्टोरी

या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते.