मुंबई : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना अनेकदा त्यांच्या नात्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, एकेकाळी दोघंही एकमेकांना डेट करत होते. पण दोन वर्षांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं आहे. दरम्यान, आता रश्मिका मंदान्नाचा को-स्टार दुल्कर सलमानने दोघांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
दुलकर सलमानने सांगितली मोठ गोष्ट
दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता दुल्कर सलमानने दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. दुलकर याला विचारण्यात आलं की, दोघं एकमेकांना डेट करत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला- "मला माहित नाही, मी त्यांच्या खूप जवळ आहे. मी सर्वांचा आदर करतो.
मी तो मित्र नाही जो त्यांना विचारेल की 'तू कोणाला डेट करत आहेस?' जर कोणाला मला सांगायचं असेल तर तो मला स्वत: सांगेल. मी त्यांना तसं कधी पाहिलं नाही. मात्र मला ते एकत्र आवडतात. मला दोघांची जोडी खूप आवडते."
मात्र, दुलकर यांच्या या विधानावरूनही दोघांच्या नात्याबद्दल काहीही स्पष्ट झालेलं नाही. अशा परिस्थितीत आता फक्त विजय आणि रश्मिकाच सांगू शकतील दोघांमध्ये नेमकं काय आहे?