Ranbeer Kapoor : रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटातून 1800 चा काळ दाखवण्यात आला आहे. त्याकाळातील जनजीवन, प्रेमकथा, लढाई, शत्रू आणि राजकारणावर आधारित असा हा चित्रपट आहे. तद्दन मसाला आणि एक्शनपट असलेला हा चित्रपट तरीही बॉक्स ऑफीसवर फारसा जादू दाखवू शकला नाही. आत्तापर्यंत या चित्रपटात 20 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाचे बजेट 150 कोटी एवढे आहे.
या चित्रपटात रणबीरसोबतच मोठे कलाकार रूपेरी पडद्यावर दिसले आहेत. संजय दत्त, वाणी कपूर असे बॉलीवूडमधील बडे स्टार्स या सिनेमातून प्रेक्षकांपुढे आले आहेत. या चित्रपटात रणबीरच्या आईची भुमिका करणारी अभिनेत्री ही मराठमोळी असून तिने हिंदी तसेच मराठी चित्रपटांतून काम केले आहे. 'शमशेरा' या चित्रपटातून त्यांनी रणबीरच्या म्हणजेच बिल्ला म्हणजेच शमशेराच्या आईची भुमिका केली आहे. त्यांचे नावं आहे इरावती हर्षे.
इरावती हर्षे यांनी टेलिव्हिजनपासून सुरूवात केली होती तसेच त्यानंतर त्यांनी चित्रपटांतूनही अनेक भुमिका केल्या आहेत. त्या स्वतः भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी तामिळ चित्रपटांतूनही कामं केलं आहे. 2000 साली आलेल्या 'हे राम' या चित्रपटातून त्यांनी शाहरूख खानच्या बायकोची भुमिका निभावली होती. इरावती या एक लोकप्रिय डबिंग आर्टिस्ट आहे. त्यांनी 'दिल तो पागल है'च्या फ्रेंच व्हर्जनमध्ये माधुरी दीक्षित यांना आवाज दिला आहे. 'गोल्डन कंपास'च्या आणि 'फेस ऑफ'च्या हिंदी व्हर्जनमध्ये निकोल किडमन या अभिनेत्रीचा आवाज त्यांनी डब केला आहे.
त्या गेली वर्षे या इंडस्ट्रीत असून 'हे राम', 'शरारत', 'मिथ्या,' 'मित्तल v/s मित्तल,' 'वुई आर फॅमिली,' 'हेट स्टोरी,' 'भाई- व्यक्ती की वल्ली' (१ आणि २) असे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांचे मोठे नावं आहे. नाना पाटेकरसोबत 'आपला मानूस' आणि महेश मांजरेकरांचा 'भाई व्यक्ती का वल्ली' या चित्रपटातून पु. ल. देशपांडेच्या पत्नीची म्हणजेच सुनीता देशपांडेची भुमिका केली होती.