'कांतारा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; 'या' दिवशी येणार सिनेमाचा प्रिक्वल तुमच्या भेटीला

कांतारा हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला अनेक अवॉर्ड्सने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाच्या प्रिक्वल संबधीत एक गुडन्यूज आहे.

Updated: Mar 23, 2023, 06:26 PM IST
'कांतारा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; 'या' दिवशी येणार सिनेमाचा प्रिक्वल तुमच्या भेटीला

मुंबई : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारा (Kantara) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला. या सिनेमाने आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. आता या संबधितच एक मोठी बातमी समोर येत आहे. जी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. कांताराच्या प्रेक्षकांसाठी आता एक सुखद धक्का आहे. या सिनेमाचा प्रिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता आणि निर्माता ऋषभ शेट्टीने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. कांतारा सिनेमाच्या प्रिक्वेलवर सध्या काम सुरु केलं आहे. उगादीच्या निमीत्ताने ही घोषणा करण्यात आली आहे. होम्बेल फिल्मने आपल्या सोशल मीडियावर घोषित केलं आहे की, कांतारा सिनेमाचा दूसरा भागाच्या स्क्रिप्टींगच्या कामावर सुरुवात झाली आहे. 

''उगादी आणि नवीन वर्षाच्या शुभदिनी आम्हाला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की, #कांताराच्या दुसऱ्या भागाचं स्क्रिप्टींग सुरु झाली आहे. आम्ही तुमच्यासाठी अजून एक मनोरंजक कथा घेवून येण्यासाठी अजून वाट नाही पाहू शकत जो नेचरसोबत आमचे संबधही दाखवेल. जास्त अपडे्स मिळवण्यासाठी संपर्कात राहा'' अशी पोस्ट सिनेमाच्या प्रोडक्शन हाउसने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कांताराच्या दुसऱ्या भागाच्या घोषणेनंतर युजर्स उस्तुक
अनेक युजर्स या ट्वीटवर रिप्लाय देत आहेत, एका युजर्सने म्हटलंय की, आम्ही या सिनेमाची खूप वाट पाहत आहोत. तर अजून एकाने ट्वीट करत म्हटलंय की, ऑल द बेस्ट, तर अजून एकाने रिप्लाय देत म्हटलंय की, कधी पर्यंत येईल सिनेमा आम्ही खूप उत्सुक आहोत. अशाप्रकारच्या बऱ्याच कमेट करत युजर्सने यावर उत्सुकता दर्शवली आहे. तर अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करत आहेत.

कांतारा हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता. यासोबतच त्याने या सिनेमात त्याने दमदार अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं होतं. 30 सप्टेंबर 2022 हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज झाला होता. कांताराने मोठ-मोठ्या सिनेमांचं रेकॉर्ड मोडत विक्रम केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला अनेक अवॉर्ड्सने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x