'या'बॉलिवूड अभिनेत्रीला विल स्मिथच्या पत्नीसारखा केस गळतीचा गंभीर आजार

 Alopecia  आजार बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला असल्याचा धक्कादायक खुलासा

Updated: Mar 31, 2022, 11:12 AM IST
'या'बॉलिवूड अभिनेत्रीला विल स्मिथच्या पत्नीसारखा केस गळतीचा गंभीर आजार  title=

मुंबई : ऑस्कर २०२२ मध्ये विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांच्यात वाद खूप चर्चेत आला. याला कारण विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथच्या आजारपणाची उडवलेली खिल्ली. जेडा Alopecia नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या आजारात मोठ्या प्रमाणात केस गळती होते. हाच आजार बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला असल्याचा धक्कादायक खुलासा तिने स्वतः केला आहे. 

अभिनेत्री समीरा रेड्डीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्याला Alopecia आजार असल्याचं सांगितलं. (गंभीर आजाराशी झुंज देतेय Will Smith ची पत्नी; ही केसगळती म्हणजे साधासुधा आजार नाही) 

 

समीराने सांगितलं की, २०१६ मध्ये तिचे पती अक्षय वर्डेने तिच्या डोक्यावर दोन इंचाचा बाल्ड स्पॉट पाहिला. यावर तिने उपचार घेतले. तिचा आजार तेव्हा शमला पण पुन्हा एकदा Alopecia आजाराने डोकं वर केल्याचं समीरा सांगते. 

समीरा लिहिते, 'ऑस्कर वादाने मला सांगितले की आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही लढाया आहेत, ज्या आपण लढत आहोत.' समीरा रेड्डी म्हणतात की अलोपेसिया या आजाराशी लढणे कठीण आहे. हा आजार तुम्हाला जास्त त्रास देत नाही किंवा संक्रमीतही होत नाही. मात्र भावनिकरित्या आपण यामध्ये खचत जातो. 

एलोपीसिया (Alopecia) म्हणजे काय ? 

एलोपीसिया (Alopecia) किंवा Alopecia Areata एक कॉमन ऑटोइन्म्यून परिस्थिती आहे. यामध्ये पीडित व्यक्तीचे केस गळण्यास सुरुवात होते. यामध्ये सुरुवातीला कपाळावरी केस गळण्यास सुरुवात होते. 

काही लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण इतकं दिसून येतं की त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस कळून जातात.