Child Actor : बॉलिवूडमध्ये ज्या कलाकारानं वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यासोबत काम करण्यासाठी त्या काळातील मोठ्या मोठ्या अभिनेत्री या लगेच होकार द्यायच्या. त्याच कलाकाराचं संपूर्ण आयुष्य हे एकतर्फी प्रेमात गेलं. प्रेम मिळालं पण ते नातं पुढे जाऊ शकलं नाही. हा कलाकार वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. तर त्यांच्या काळातील एक लोकप्रिय अभिनेता ठरला. या बालकलाकारानं रेखा आणि बिंदिया गोस्वामी यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले. तुम्ही ओळखलत का या बालकलाकाराला?
या बालकलाकाराचं नाव विनोद मेहरा आहे. विनोद मेहरा यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांना मोठ्या पडद्यावर जितकं यश मिळालं त्यांची स्तुती झाली. तितकीच त्यांचं खासगी आयुष्य अशांत होतं. विनोद मेहरा यांचं नाव रेखा यांच्यासोबत अनेकदा जोडण्यात आले. इतकंच नाही तर अशा देखील चर्चा सुरु झाल्या होत्या की रेखा आणि त्यांचं लग्न झालं आहे. मात्र, त्या दोघांनी कधीच यावर स्पष्ट वक्तव्य केलं नाही. या सगळ्यात विनोद मेहरा यांच्या कुटुंबानं त्यांचं लग्न लावून दिलं. पण त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. त्यानंतर त्याना अभिनेत्री बिंदिया गोस्वामीवर प्रेम झालं.
दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की विनोद मेहरा यांनी बिंदिया गोस्वामी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्यासोबत भांडण झाल्यानंतर बिंदिया गोस्वामी यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत असलेलं नातं तोडलं. त्यानंतर विनोद मेहरा यांनी किरण नावाच्या मुलीशी लग्न केलं. तेव्हा विनोद यांच्या आयुष्यात असलेला एकटेपणा कमी झाला. पण त्यांचं नात फक्त दोन वर्षेच टिकलं. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि विनोद मेहरा यांनी अखेरचा श्वास घेतला. तर विनोद यांच्या पहिल्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आईच्या इच्छेनं मीना ब्रोकाशी लग्न केलं होतं.
हेही वाचा : एका चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहम झाला 75 कोटींच्या बंगल्याचा मालक; आता आमिर खान- प्रीति जिंटाचा शेजारी
विनोद मेहरा हे त्यांच्या काळातील सगळ्यात लोकप्रिय कलाकार होते. त्यांचं नावं त्या काळातील कलाकार अमिताभ बच्चन, विनोद खन्ना यांच्यासारख्या टॉल आणि स्टायलिश स्टार्समध्ये घेतले जायचे. या सगळ्यात त्यांच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनात त्यांनी यशस्वीरित्या जागा केली होती. त्यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. बालकलाकार म्हणून सुरु झालेला विनोद मेहरा यांचा प्रवास निर्माता आणि दिग्दर्शक होईपर्यंत सुरु होता. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून गुरुदेव हा चित्रपट केला, पण हा चित्रपट पूर्ण करण्याआधी वयाच्या 45 व्या वर्षी निधन झालं.