इंटरनेटवर व्हायरल होतोयं हा डान्स, लाखोंनी पाहिला व्हिडिओ

आतापर्यंत या गाण्याला 972,368 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Updated: Sep 28, 2018, 08:38 AM IST
इंटरनेटवर व्हायरल होतोयं हा डान्स, लाखोंनी पाहिला व्हिडिओ title=

नवी दिल्ली : सध्याच्या युगात तरुणांच टॅलेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचतं. आपल स्किल दाखविण्यासाठी ते इंटरनेटचा पुरपूर वापर करुन घेतात. याच महिन्यात रिलीज झालेल्या जॅकी भगनानी यांच्या 'मित्रो' सिनेमातील एक गाणं सध्या खूप व्हायरल होतयं. 'कमरिया' या गाण्यावर सध्या तरुणाई थिरकताना दिसत आहे. या गाण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की बहुतांश तरुण या गाण्याच्या स्टेप्स फॉलो करुन आपला डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

लाईक्स, कमेंट्सचा पाऊस 

 सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्वी नायर नावाच्या युट्यूब चॅनलहून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलायं. या व्हिडिओ दोन युवकांसोबत एक तरुणी 'कमरिया' गाण्यावर थिरकताना दिसतेय. या तिघांनी मिळून जबरदस्त डान्स केलाय. आतापर्यंत या गाण्याला 972,368 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या महिन्याच्या 14 तारखेला हा व्हिडिओ अपलोड केला होता. शेकडो व्हूय, लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या व्हिडिओवर पडत आहे.

विविध डान्स स्टेप्स 

या व्हिडिओतील डान्समध्ये तिघांचा उत्तम ताळमेळ पाहायला मिळतोय. 2.29 मिनिटाच्या व्हिडिओ परफोर्मन्समध्ये दोन मुलं आणि एका मुलीच्या वेगवेगळ्या डान्स स्टेप पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस पडतोय.