बीग बींसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे बॉलुवूडची टॉप अभिनेत्री; ओळखलंत का?

 सोशल मीडियाच्या या युगात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत सहज पोहोचतात.

Updated: Aug 8, 2022, 11:32 PM IST
बीग बींसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे बॉलुवूडची टॉप अभिनेत्री; ओळखलंत का?  title=

मुंबई : सोशल मीडियाच्या या युगात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत सहज पोहोचतात. कधी-कधी सेलिब्रिटी स्वत:च त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असतात. तर कधी इतर स्रोतांकडून माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचते.

त्याचप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही अचानक सोशल मीडियावर दिसतात आणि ते पाहून त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांना ओळखणं कठीण होतं. अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन सूट आणि टाय घालून हाताची घडी घालून एका कार्यक्रमात बसलेली दिसत आहेत. तिच्या शेजारी एक मुलगीही बसलेली दिसत आहे आणि ती कॅमेराकडे पाहत आहे. ही मुलगी खूप गोंडस दिसत आहे. ही निरागस चिमुरडी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जर तुम्ही अद्यापही या मुलीला ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला एक छोटीशी सूचना देतो की, तिने सलमान खानसोबत असलेल्या पत्थर के फूल या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. ही अभिनेत्री अमिताभ यांच्यासोबत आणि अक्स आणि बडे मियाँ छोटे मियाँ सारख्या काही चित्रपटांमध्येही दिसली आहे.

खरंतर, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या 'ब्लॅक अँड व्हाइट' फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची हार्टथ्रोब रवीना टंडन आहे. ही तीच रवीना टंडन आहे जिला 1994 साली प्रदर्शित झालेल्या मोहरा चित्रपटातून जबरदस्त नाव आणि प्रसिद्धी मिळाली. रवीना टंडन आज 47 वर्षांची झाली आहे. मात्र तिचं सौंदर्य आणि तिची फिटनेस अजूनही अशी आहे की, ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींना मागे टाकते. रवीना टंडन शेवटची साऊथचा सुपरस्टार यशचा चित्रपट KGF 2 या वर्षी एप्रिलमध्ये दिसली होती.