...म्हणून विवाहस्थळासाठी प्रियांकाची जोधपूरला पसंती

या वर्षाच्या शेवटपर्यंतही सेलिब्रिटींमध्ये पाहायला मिळणारी लगीनघाई काही केल्या कमी झालेली नाही. 

Updated: Nov 18, 2018, 10:42 PM IST
...म्हणून विवाहस्थळासाठी प्रियांकाची जोधपूरला पसंती

मुंबई : यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहात आहेत. अगदी या वर्षाच्या शेवटपर्यंतही सेलिब्रिटींमध्ये पाहायला मिळणारी लगीनघाई काही केल्या कमी झालेली नाही. 

एकिकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या चर्चा सुरु असतानाच आता 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नसोहळ्याकडे सर्वाचं लक्ष वेधलं  आहे. 

प्रियांकाच्या लग्नाची तरीख आता जवळ येत असल्यामुळे जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथेही लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. प्रियांकाची आई, मधू चोप्रा या सध्या जोधपूरमध्ये दाखल झाल्या असून, तयारी कुठवर आली आहे, यामध्ये जतीने लक्ष देत आहेत. 

प्रियांकाही इतर कलाकार मंडळींप्रमाणे परदेशातच विवाहबद्ध होण्याच्या चर्चा होत्या. पण, तिने मात्र आपल्या मायदेशी अस्सल भारतीय पद्धतीनेच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यातही तिने जोधपूरचीच निवड का केली, असा प्रश्न तिच्या आईला यावेळी विचारण्यात आला. 

माध्यमांच्या या प्रश्नाचं उत्तर देत,  हे आपलं आवडतं ठिकाण असून याच एका कारणामुळे सारं जग सोडून आम्ही या ठिकाणाची निवड केल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीविषयी फार माहिती न देता, आतापासूनच त्याविषयी फार काही सांगण्यापेक्षा लग्न झाल्यावर गोष्टी सर्वांसमोर येतीलच असंही त्या म्हणाल्या. 

तेव्हा आता आपल्या आईच्या आवडीच्या या ठिकाणी विवाहबद्ध होण्यासाठी सज्ज असणारी प्रियांका याविषयी आपली काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय तिच्या लग्नात नेमकं कसं आणि कोणत्या प्रकारे वेगळेपण जपलं जाणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.