भुकेच्या नादात सलमान खान करुन बसला हे काम, ऐकून धक्का बसेल

बॉलिवूड स्टार सलमान खान आपल्या फिट बॉडी आणि धाकड अपीयरंससाठी ओळखला जातो.

Updated: Oct 27, 2021, 10:57 PM IST
भुकेच्या नादात सलमान खान करुन बसला हे काम, ऐकून धक्का बसेल

मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खान आपल्या फिट बॉडी आणि धाकड अपीयरंससाठी ओळखला जातो. दबंग खानचा आवाज आणि पर्सनॅलिटीचं वजन सांगतं की, त्याचं डेली रुटिन कसं असेल. सलमान खान आपलं जिम वर्कआऊट कधीच चुकवत नाही. आणि आपल्या डाईटला घेवून तो भरपूर अलर्ट असतो.

भूक लागल्यावर सगळं विसरतो सलमान
भूक लागल्यावर सलमान खान डाईटचे सगळे नियम विसरुन जातो? होय एकदा सलमान खानने हे काम देखील केलं आहे. एका रिपोर्टनुसार मराठा मंदिरचे एक्सिक्यूटिव्ह डायरेक्टर मनोज देसाई यांनी याबद्दल मनमोकळे पणाने सांगितलं होतं.

सलमानने एकाचवेळी खाल्ले तीन समोसे 
मनोज देसाई यांनी सांगितले की, 'सलमान खान आणि माझं बोलणं जियो वर्ल्ड ड्राईव्हला जात असताना झालं होतं. हे चांगलं झालं की, नंतर तो गेटी गॅलेक्सीमध्ये आला. आयुष आणि त्याने दार उघडलं. गंमत म्हणजे त्याला खूप भूक लागली होती. आमच्या कॅन्टीनमधून त्याने तीन समोसे खाल्ले. त्याला हे करताना पाहून खूप छान वाटलं.

'अंतिम'मध्ये दाखवणार जबरदस्त एक्शन
सलमान खान लवकरच त्याचा मेहूणा आयुष शर्मासोबत 'अंतिम' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत असून आयुष शर्मा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जबरदस्त टक्कर या चित्रपटात दाखवण्यात आली असून या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.