साराच्या वक्तव्यामुळे सलमान खान नाराज; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

सारा अली खान तिच्या बबली स्टाईलसाठी ओळखली जाते.

Updated: Jun 26, 2022, 12:43 PM IST
साराच्या वक्तव्यामुळे सलमान खान नाराज; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या title=

मुंबई : सारा अली खान तिच्या बबली स्टाईलसाठी ओळखली जाते. पण तिची ही स्टाइल अनेकदा महागात पडते. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सलमान खानसाठी सारा अली खानच्या तोंडून अशी गोष्ट बाहेर पडली, जी ऐकून केवळ सलमानच नाही तर इव्हेंटमध्ये बसलेले सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. होय, नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये साराने भाईजानला सगळ्यांसमोर अंकल म्हटलं, त्यानंतर अभिनेत्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे.

सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बोलता-बोलता सारा सलमान खानला अंकल म्हणते, त्यानंतर सलमान खानचा चेहरा पडतो. तो नाराज होतो. सलमान हातवारे करत म्हणतो की, तुझा पिच्चरतर आता गेला. ज्यानंतर सारा म्हणते की, माझा पिच्चर का गेला. यानंतर सारा म्हणते तुम्हीचतर सांगितलं की, अंकल म्हणा. हे ऐकल्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या स्टार्सना आपलं हसू अनावर होतं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साराविषयी बोलायचं झालं तर सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. शेवटच्या वेळी ती अतरंगी रे या चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर ती विकी कौशलसोबत तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.