'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!' 'या' व्यक्तीने प्राजक्ता माळीला केलं जाहीर प्रपोज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'लाखो दिलो की धडकन' आहे. प्राजक्ताला चर्चेत येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. प्राजक्तामाळीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे देखील जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. 

Updated: Sep 1, 2023, 06:24 PM IST
'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!' 'या' व्यक्तीने प्राजक्ता माळीला केलं जाहीर प्रपोज title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'लाखो दिलो की धडकन' आहे. प्राजक्ताला चर्चेत येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. प्राजक्तामाळीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे देखील जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. प्राजक्ताने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीच तर ती अवघ्या काही वेळातच व्हायरल होते. एका क्षणात प्राजक्ताची पोस्ट चर्चेचा विषय बनते. नुकतेच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं जे चांगलंच गाजलं.

नुकतेच प्राजक्ता माळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये प्राजक्ता माळी काळ्या रंगाच्या ब्लेजर ड्रेसमध्ये दिसली होती. तिचे हे फोटो अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागले. अनेक चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव देखील केला. तर एका चाहत्याने प्राजक्ताला जाहीर प्रपोज केलं. या चाहत्याने कमेंट करत लिहीलं, ब्यूटी क्वीन  स्वर्गाची आणि माझ्या हृदयाची आणि आत्मा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रिय प्राजू आणि या ड्रेसमध्ये सुंदर आणि गोंडस दिसत आहे आणि माझे व्हॅलेंटाईन हार्ट. या चाहत्याची कमेंट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

तर अजून अनेक चाहत्यांनी तिच्य या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं की, Ohhh कोई तो रोक लो, तर अजून एकाने लिहीलंय, किती सुंदर तो चेहरा तर अजून एकाने म्हटलंय, किती cute poses दिले आहात तुम्ही  आणि माफ करा खूप उशिराने कमेंट करतोय. तर अजून एकजम म्हणतोय, विश्वातील सर्वात सुंदर स्त्री आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्मित  तू किती सुंदर आहेस तू माझ्या हृदयाची राणी आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो मॅडम  मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे . अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या या फोटोशूटवर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.  अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकदा तिला चाहते तिच्या लग्नाबाबत प्रश्नही विचारत असतात.