तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : कधी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रींचं होतं तवायफ कुटुंबाशी खास संबंध... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 8, 2024, 10:56 AM IST
तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड title=
(Photo Credit : Social Media)

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : गेल्या महिन्याभरापासून ओटीटीवर हीरामंडी या सीरिजची चर्चा सुरु आहे. या सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच तिनं सगळ्यांना वेड लावलं आहे. संजय लीला भन्साळी यांची ही सीरिज अनेकांच्या पसंतीस उतरली. तर काही लोक त्यात चुका शोधत होते. खरं तर या सीरिजची कहानी 1920 च्या दशकातील हीरामंडीवर आधारीत आहे. ज्यात खूप अशी पावरफुल असलेल्या मल्लिकाजान आणि फरीदन एकमेकांचे कट्टर विरोधी असतात. यात सीरिजमधील कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयानं वेड लावलं आहे. त्यात आज आपण अशा काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत जे तवायफच्या कुटुंबाचा भाग आहेत. 

1. नरगिस

सगळ्यात पहिलं नाव हे बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री आणि 'मदर इंडिया' म्हणजेच नरगिस आहेत. नरगिस यांनी उन्होंने ‘जागते रहो’, ‘श्री 420’, ‘मदर इंडिया’, ‘आवारा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. नरगिस यांची आई जद्दनबाई कोलकाताच्या लोकप्रिय तवायफ होत्या. त्यांना भारताला कोठ्यातून भेटलेली पहिली महिला गायिका म्हणून लोक ओळखतात. त्या लहानाच्या मोठ्या कोठ्यावर झाल्या. जद्दनबाई यांची आई दलीपाबाई म्हणजेच नरगिस यांची आजी या देखील इलाहाबादच्या लोकप्रिय तवायफ होत्या. 

२. सायरा बानो

सायरा बानो यांचं तवायफांशी खास संबंध आहेत. त्यांची आई, आजी आणि पणजी आजी तिघेही कोठ्यात बसायचे. असं म्हणतात की त्यांच्या आई आणि आजीचा दिल्लीत स्वत: चा कोठा होता. त्यांचा स्वत: चा कोठा असला तरी देखील त्यांनाही या व्यवसायता येण्यास भाग पाडले होते. सायरा बानो यांच्या पणजी आजीचं नाव जुम्मन बाई होतं. त्यांना वयाच्या 7 व्या वर्षी कोठ्यात बसवण्यात आलं होतं. त्या 18 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांना एक मुलगी होती. त्यांच्या मुलीचं नाव शमशाद ठेवण्यात आलं होतं. शमशाद सायरा बानो यांची आजी होत्या.  

हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा

३. फातमा बेगम

फातमा बेगम यांच्या विषयी बोलायचे झाले तर त्या बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका आहेत. फातमा या देखील वरच्या दोन अभिनेत्रींप्रमाणेच तवायफ कुटुंबातून आहेत. दिग्दर्शिका होण्यासोबत त्यांनी एक अभिनेत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वत: चं एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केलं. या प्रोडक्शन हाउसं नाव विक्टोरिया-फातमा फिल्म्स असं होतं.