मुंबई: बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आणि अनेकांना धक्का बसला. पण, अशा प्रकारे धक्कादायक मृत्यू केवळ श्रीदेवींचाच झाला नाही. तर, इतरही काही कलाकार आहेत. ज्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बूडन झाला आहे. कोण आहेत ते कलाकार?
विटनी ह्यूस्टन: अमेरिकेतील अभिनेत्री आणि मॉलेड विटनी ह्यूस्टन हिचाही मृत्यू बाथटबमध्ये बूडनच झाला होता. तिच्या शवविच्छेदन अहवालात म्हटले होते की, तिचा मृत्यू हृदयाशी संबंधीत आजार आणि कोकेनचे अतीसेवन केल्याने झाला. अनुमान असे की, नशेमध्ये असताना ती बाथटबमध्ये पडली.
बॉबी क्रिस्टीना ब्राऊन : धक्कादायक असे की, बॉबी क्रिस्टीना ब्राऊन ही विटनी ह्यूस्टनची मुलगी. तिचाही मृत्यू आपल्या आईप्रमाणेच झाला. २०१५मध्ये तिचे शव बाथटबमध्ये आढळून आले होते. मीडिया रिपोर्टनुसार तिनेही अंमली पदार्थांचे सेवन केले होते.
जिम मॉरिसन : मृत्यूसमी मॉरिसनचे वय केवळ २८ वर्षांचे होते. त्याचेही शव ३ जुलै १९७१मध्ये बाथरूममधील बाथटबमध्ये आढळून आले होते.
ज्यूडी गारलॅंड : अमेरिकन पॉप सिंगर आणि अभिनेत्री ज्यूडी गारलॅंड हिचाही मृत्यू याच प्रकारातील. वयाच्या ४७व्या वर्षी तीचा मृतदेह बाथरूममधील बाथटबमध्ये (१९६८) सापडला. तिच्याही शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवन केल्याचे म्हटले होते.
मायकल जॅक्सन : जगप्रसिद्ध पॉप गायक आणि डान्सर ज्याला किंग ऑफ पॉप नावाने जगभर ओळखले गेले त्या मायकल जॉक्सनचाही मृत्यू अशाच प्रकारे झाला. २५ जून २००९ ला त्याचा मृत्यू झाला. त्याच्या 'धिस इज इट' या शोच्या सुरूवातीलाच त्याचा मृत्यू झाला. अंमली पदार्थांची मात्र अधिक प्रमाणात घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याचा मृतदेह बाथटबमध्ये आढळून आला.
लेनी ब्रूस : ४० वर्षाच्या लियोनार्ड अल्फ्रेड श्नाईजर याला लेनी ब्रूस या त्याच्या स्टेज नावाने ओळखले जात असे. ३ ऑगस्ट १९९६मध्ये त्याचा मृत्यू बाथटबमध्ये बूडून झाला. त्याच्या मृत्यूदरम्यानचा फोटो अत्यंत भायनक होता. जो आजही प्रसिद्ध करण्यात आला नाही. नजरचूकीने मर्फीनची मात्रा अधिक घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
एल्विस प्रेसली : मृत्यूसमयी वय वर्षे ४७ असलेल्या प्रसलीचे शव १६ ऑगस्ट १९७७मध्ये टॉयलेटमध्ये फरशीवर पडलेल्या आवस्थेत मिळाले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र त्याचा मृत्यू अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला होता. पण कुटुंबिय आणि डॉक्टरांची सामाजिक पत वाचविण्यासाठी हृदयविकाराचे कारण पुढे करण्यात आले होते. त्याला नशील्या औषधांचे सेवन करण्याची वाईट सवय होती.
ब्रिटनी मर्फी : हॉलिवूडची कलाकार ब्रिटनी मर्फीचा मृत्यू डिसेंबर २००९मध्ये झाला. अंघोळ करताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. मात्र, न्युमोनियाची लागण झाली असताना ड्रग्जची अधिक मात्रा घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.