आलिया- रणबीरच्या बहिणींमध्ये वाद

त्यामागचं मूळ कारण.... 

Updated: Sep 15, 2019, 09:13 AM IST
आलिया- रणबीरच्या बहिणींमध्ये वाद  title=
आलिया- रणबीरच्या बहिणींमध्ये वाद

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या आणि साखपपुड्याच्या चर्चांना दर दिवशी उधाण येत असतं. एकिकडे आलिया तिच्या सर्वात खास मित्राच्या, जवळच्या व्यक्तीच्या म्हणजेच रणबीरच्या कुटुंबीयांसमवेत सहजपणे वावरताना दिसते तोच दुसरीकडे मात्र आता या दोघांच्याही बहिणींमध्ये झालेल्या एका वादाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

अर्थात आलियाची बहीण पूजा भट्ट आणि रणबीरची चुलत बहीण करिष्मा कपूर यांच्यातील हा वाद हल्लीचा नव्हे. तर तो काही वर्षांपूर्वीचा आहे. किंबहुना या दोघींनीही माध्यमांसमोर त्यांच्यातील मतभेद स्पष्टपणे मांडले होते. हा वाद त्यावेळी झाला होता, जेव्हा आलियाच्या बहिणीने म्हणजेच पूजा भट्ट हिने करिष्मा कपूरच्या आई- वडिलांविषयी एक वक्तव्य केलं होतं. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा करिष्मा आणि करिना कपूरच्या आईवडिलांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली होती. 

पूजाच्या वक्तव्यावर थेट शब्दांत नाराजी व्यक्त करत करिष्मा कपूर हिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत यामध्ये आपला काय दोष.... असा प्रश्न उपस्थित केला होता. 'सांगा यात माझी काय चूक? ही तर पूजा भट्ट आहे जिने माझ्या आई-वडिलांविषयी बेताल वक्तव्य केलं. मी तिचा याचं उत्तर दिलं आहे, कारण माझ्या पालकांविषयी काहीही बोलण्याचा तिला अधिकार नाही', असं करिष्मा म्हणाली होती. यावेळी तिने अभिनेत्री मनीषा कोईराला हिच्यावरही एका वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. 

Throwback: जब रणबीर कपूर और आलिया भट्ट की बहनों करिश्‍मा-पूजा में हुआ था जबरदस्‍त झगड़ा

पूजा आणि करिष्मामध्ये झालेला हा वाद बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेला होता. पण, काळानुरूप या वादही विस्मरणात गेला. सध्याच्या घडीला आलिया आणि रणबीरच्या कुटुंबांमध्ये चांगला सलोखा पाहायला मिळतो. सोशल मीडियापासून ते अगदी भेटीगाठीपर्यंत या मंडळींचे मैत्रीपूर्ण संबंध अनेकांना हेवा वाटतील असेच आहेत.