Ti Parat Aaliye मालिकेत 'ती' ची भूमिका साकारतेय ही अभिनेत्री

मराठीत अनुभवता येणार थ्रिलर 

Updated: Aug 17, 2021, 10:32 AM IST
Ti Parat Aaliye  मालिकेत 'ती' ची भूमिका साकारतेय ही अभिनेत्री

मुंबई : 'ती परत आलीये' या मालिकेचे प्रोमोज रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल चर्चा रंगली आहे. इतकंच काय तर या मालिकेच्या प्रत्येक प्रोमोसोबत प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. प्रोमो मध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम याना प्रेक्षकांनी पाहिलं पण इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

आता 'ती परत आलीये' मालिकेत तीची भूमिका साकारणार कोण? याची चर्चा रंगली होती. कुंजिका काळविंट झी मराठीवरील आगामी मालिका 'ती परत आलीये' या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत कुंजिका सोबत अजून अनेक कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

विजय कदम यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कुंजिकाने आनंद व्यक्त केला तसंच थ्रिलर जॉनर हा आवडीचा असून त्या जॉनरच्या मालिकेत काम करताना खूप मजा येतेय अशा भावना कुंजिकाने व्यक्त केल्या.

"यापूर्वी मालिकेत मी खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत होतं. एक कलाकार म्हणून मला नव्या भूमिकांचं अवकाश शोधयचं होतं. जिथं मला नवं काही शिकायला मिळेल. ही संधी ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मिळाली. मला स्वतःला थ्रिलर हा प्रकार अधिक आवडतो. त्यामुळे अशा मालिकेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे.

ही भूमिका आव्हानात्मकदेखील आहे. ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण, हे गूढ उलगडताना पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसंच या मालिकेमुळे मला ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे." असं कुंजिका सांगते. पहा ती परत आलीये सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त झी मराठीवर