बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?

Tiger 3 Trailer : 'टायगर 3' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून अॅक्शन पॅक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 16, 2023, 12:53 PM IST
बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer  तुम्ही पाहिलात का? title=
(Photo Credit : Social Media)

Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. सलमान खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून यावेळी झोया म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ देखील दिसली आहे. 

सलमानच्या 'टायगर 3' या चित्रपटाचा ट्रेलर हा 2.51 मिनिटांचा आहे. या ट्रेलरची सुरुवाती देशात शांती आणि देशाचे शत्रु यांच्यात असलेलं अंतर किती आहे माहितीये... फक्त एका व्यक्तीचं.... टायगर या दमदार डायलॉगनं होतं. त्यानंतर सलमान आणि कतरिना या दोघांचे अॅक्शन सीन्स पाहताना मिळतात. यात टायगरला कुटुंब किंवा देश यातून एक निवडायचे असते. हे दोन ऑप्शन असताना टायगर कोणाला निवडतो हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. दुसरीकडे कुटुंबासोबत टायगर कसा राहतो तो कसा मुलासोबत वेळ व्यथित करतो हे पाहून अनेकांना आनंद झाला आहे. तर चित्रपटात झोया म्हणजेच कतरिना कैफचा अॅक्शन पॅक अवतार पाहायला मिळत आहे. सलमानचे पाकिस्तानात पोहोचणे यात कतरिनाचा काही हात आहे असा प्रश्न ट्रेलरच्या शेवटी अनेकांना पडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इमरान हाश्मी देखील दिसत आहे. इमरान हाश्मी देखील हा पाकिस्तानातील असतो. यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' चा ट्रेलर खरंच खूप ब्लॉकबस्टर आहे. 

कुटुंब की देश कोणाला निवडणार टायगर?

Tiger 3 च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे की देशाची रक्षा करणारा एक्स रॉ एजंट अविनाश सिंह राठोड पुन्हा एकदा मिशनवर निघाला आहे. पण हे मिशन त्याची ओळख मिळवण्यासाठी आहे. यात अविनाश उर्फ टायगरनं भारताचे रक्षण करण्यासाठी त्याच्या आयुष्यातील 20 वर्षे घालवली, त्यानंतर त्याला देशासोबत विश्वासघात करणारा आणि शत्रू असल्याचे सांगितले आहे. अखेर असं का करण्यात आलं आणि आता अविनाशला कशी त्याची ओळख मिळू शकते. हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

हेही वाचा : ऋषभ पंतचं Latest Location शोधत होती उर्वशी? मोबाईल चोरामुळं अभिनेत्रीची गुपितं समोर 

या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही आदित्य चोप्रा यांनी यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना आणि इमरान महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक था टाइगर'  आणि 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टाइगर जिंदा है' या फ्रेन्चायझीमधील तिसरा भाग आहे. तर हा YRF च्या स्पाय यूनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या आधी 2019 मध्ये ऋतिक रोशन, टाइगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांचा 'वॉर' आणि याच वर्षी शाहरुख खानचा पठाण प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुर्हुतावर प्रदर्शित होणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x