मुलाच्या लग्नात टीना अंबानींनी निवडलं सर्वात हटके आऊटफिट, ठरल्या 'मॉर्डन सासूबाई'

 टीना अंबानींच्या फॅशनने सगळ्यांना मॉर्डन सासूचा लूक नक्की कसा असावा याचा अनुभव मिळाला आहे

Updated: Feb 24, 2022, 02:21 PM IST
   मुलाच्या लग्नात टीना अंबानींनी निवडलं सर्वात हटके आऊटफिट, ठरल्या 'मॉर्डन सासूबाई' title=

मुंबई : अंबानी फॅमिली सध्या मुलाच्या लग्नामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हा लग्नसोहळा अर्थातच शाही पद्धतीने करण्यात आला. या सोहळ्याला मोठ मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

 टीना अंबानी यांनी मुलगा जय अनमोलसोबत विवाहगाठ बांधलेल्या क्रिशा शाह या आपल्या सूनेचं कुटुंबात स्वागत केले. क्रिशा आणि अनमोलचे ही शाही लग्न अनेक कारणांमुळ ट्रेंडसेटर ठरले.

मग ते जबरदस्त वऱ्हाडी असो किंवा दोघांच्या मेहंदी समारंभापासून ते लग्नापर्य़ंतचे आऊटफिट असो...

कुटुंबातील सदस्यांनी देखील या लग्नात आपले पोशाख उठाव दिसण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचं बोललं जात आहे. त्यात आता वधू अनमोलची आई टीना अंबानी यांनी परिधान केलेला लेहंगा सगळ्यांचं लक्षवेधत आहे. 

टीना अंबानी यांनी  या लग्नासाठी खास डिझाईन केलेला आऊटफिट निवडला. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. टीना अंबानी यांनी मुलाच्या लग्नात केलेला लूक सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणार ठरत आहे.

हळदीपासून लग्नापर्यंत, टीना अंबानींच्या फॅशनने सगळ्यांना मॉर्डन सासूचा लूक नक्की कसा असावा याचा अनुभव मिळाला आहे, असं बोललं जात आहे.