टीना अंबानी यांच्या जीवनातील खास व्यक्तींचा फोटो पहिल्यांदा समोर...

अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. महिला दिनाच्या दिवशी देखील अंबानी कुटुंब एक फोटोमुळे चर्चेत आलं.   

Updated: Mar 9, 2022, 12:15 PM IST
टीना अंबानी यांच्या जीवनातील खास व्यक्तींचा फोटो पहिल्यांदा समोर... title=

मुंबई : अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. महिला दिनाच्या दिवशी देखील अंबानी कुटुंब एक फोटोमुळे चर्चेत आलं. माहिला दिनाचं निमित्ताने अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांनी बहिणींसोबत एक फोटो शेअर केला आहे. टीना अंबानी यांचा हा फोटो त्यांचा मोठा मुलगा अनमोलच्या लग्नातील आहे.

टीना अंबानी यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'माझ्या बहिनींना आणि आयुष्यातील सर्व महिलांना चियर्स...' शिवाय त्यांनी सर्व महिलांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

देव आनंदसोबत बॉलिवडमध्ये पदार्पण 
टीना अंबानी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांचं करियर लहान होतं पण त्यांनी त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्यांनी 1978 साली 'परदेस' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले..

त्यानंतर टीना यांनी 'कर्ज', 'लूटमार', 'आपके दीवाने', 'रॉकी', 'सुराग', 'सौतन', 'बडे दिलवाले', 'पुकार', 'अलग-अलग', 'युद्ध', 'भगवान दादा', 'कामग्नि', 'मुकद्दर का फैसला' आणि 'जिगरवाला' यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भुमिका साकारली.