Kamal Haasan Birthday : कमल हासन आहेत इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक, आकडा ऐकून व्हाल थक्क

कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया...

Updated: Nov 7, 2022, 11:03 AM IST
Kamal Haasan Birthday : कमल हासन आहेत इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक, आकडा ऐकून व्हाल थक्क title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं अभिनेता कमल हासन  (Kamal Haasan) यांनी सगळ्यांची मने जिंकली. कमल हासन यांचे चाहते फक्त दक्षिणेत नाही तर संपूर्ण भारतात चाहते आहेत. कमल हासन यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. कमल हासन यांचा जन्म आज 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. कमल हासन हे सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया...

कमल हासन यांची एकूण संपत्ती आहे इतक्या कोटींची

कमल हासन यांनी त्यांच्या चित्रपटातून कमाई केली. चित्रपटांच्या कमाईसोबतच कमल अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतात. या ब्रँड्सच्या जाहिरातीसाठी कमल खूप मानधन घेतात. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन यांची एकूण संपत्ती 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : बॉलिवूडला रामराम करणार वरुण धवन? अभिनेत्याच्या वक्तव्यामुळं एकच खळबळ

कमल हासन यांचे चैन्नईत आलिशान घर आहे. कमल यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या या घरात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन यांच्या या घराची किंमत ही जवळपास 30 कोटी रुपये आहे. याशिवाय कमल हासन यांची परदेशातही संपत्ती आहे. (total net worth birthday of superstar kamal haasan) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कमल हासन यांना महागड्या गाड्यांचीही आवड आहे. कमल हासन यांच्या कार कलेक्शनमध्ये हमर, ऑडी आणि लिमोजीन सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. या सगळ्या गाड्यांची किंमत ही कोटींच्या घरात असल्याचे म्हटलं जाते. कमल हासन हे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. 1994 मध्ये कमल हासनने आपल्या एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी घेतल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, एवढी फी घेणारे ते पहिला भारतीय कलाकार ठरले होते.