'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला

चित्रपटातून भेटीला आलेलं 'डायनासोर'च्या भव्यदिव्य आणि रूद्र रूपाने जगभरातील रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

Updated: Feb 5, 2018, 03:48 PM IST
'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला

मुंबई : चित्रपटातून भेटीला आलेलं 'डायनासोर'च्या भव्यदिव्य आणि रूद्र रूपाने जगभरातील रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

डायनासॉरचं रूप अंगावर काटा आणणारं आहे. सोबतच बॉक्सऑफिसवरही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता. या या सीरिजमधील अजून एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम'

  'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलिज करण्यात आला आहे. माणूस आणि प्राण्यांमधील संघर्ष पुन्हा रसिकांच्या अंगावर काटा आणणारा ठरणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता क्रिस पॅट प्रमुख भूमिकेत आहे. 
 ज्युरासिक वर्ल्ड चित्रपटामध्ये क्रिस अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.  

 
 डायनारोरचं भव्य रूप  

 डायनासॉरला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी स्टीवन स्पिलबर्ग यांनी मेहनत घेतली आहे. त्यांनी या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. हा चित्रपट भारतामध्ये अमेरिकेच्या आधी दोन आठवडे रिलीज करण्यात येणार आहे.  अमेरिकेत 22 जून तर भारतामध्ये हा चित्रपट 8 जून रोजी रिलीज करण्यात येईल.  'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' हा चित्रपट ज्युरासिक सीरिजमधील पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग इंग्लंड आणि हवाईमध्ये करण्यात आले आहे.  

 

 

 जे.ए. बेयोना यांचे दिग्दर्शन 

  'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' या चित्रपटाचे दिग्दर्शन  जे.ए. बेयोना यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये जेफ गोल्डब्लम,  ब्राइस डलास हॉवर्ड, क्रिस पॅट आणि इयान मॅलकम प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता इरफान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x