विनयभंग करणाऱ्याला दीपिकाने कानशिलात लगावली

 चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाला करणी शिवसेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 5, 2018, 12:58 PM IST
विनयभंग करणाऱ्याला दीपिकाने कानशिलात लगावली

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावत’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई सुरु आहे.. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाला करणी शिवसेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. 

दीपिका पदुकोनने सांगितला तो धक्कादायक प्रसंग

या सर्व परिस्थितीला कसं सामोरं जायचं, यासाठी दीपिकाने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग एका कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे. 

भररस्त्यात कॉलर पकडून कानशिलात

वयाच्या १४व्या वर्षी  विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला भररस्त्यात कॉलर पकडून कानशिलात लगावली होती. तसेच युवतींनीही अशा प्रसंगाना धैर्याने सामोरे जावं, असं दीपिकाने यावेळी सांगितलं.