Tamil Songs 2022: गेल्या काही वर्षांमध्ये साऊथ इंडियन (South Indian) चित्रपटाने अनेकांना वेड लावले आहेत. बाहुबली (Bahubali), RRR असो K.G.F या चित्रपटाने साऊथसोबतच महाराष्ट्रासोबत इतर राज्यातही धुमाकूळ घातली आहे.तमिळ (Tamil) आणि मल्याळम (Malayalam) गाण्यांनी तरुण पिढीला मंत्रमुग्ध केलं आहे. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल (viral) होतं आहे. या गाण्याचे शब्द आपल्याला कळतं नाही, पण हे गाणं (song) सतत ऐकत राहावसं वाटतं.
साऊथमधील एका कार्यक्रमात दोन तरुण गायिकांनी गायलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधन घेत आहे. मधुर अशा स्वरात या दोघींनी ज्या प्रकारे हे गाणं म्हटलं आहे, ते ऐकून कोणालाही वेड लागेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) उघडल्यावर या गाण्यावर अनेक रील्स तर दिसतं आहेतच. पण हे गाणं अजून स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेल्या दोन सुंदर परी इतक्या मधुर स्वरात गात आहेत की, संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. (trending Thiruchitrambalam songs medley performance at the Audio Launch viral on Social media nm )
दक्षिणेचा सुपरस्टार धनुष (South Superstar Dhanush) याची मुख्य भूमिका असलेल्या थिरुचित्रंबलम (Thiruchitrambalam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हे गाणं आहे. 'थिरुचित्रंबलम' जगभरात 100 कोटींची (100 Crore Club) कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 100 कोटींचा टप्पा गाठणारा धनुषचा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे. चित्रपटात ‘नित्या मेनन’ (Nitya Menon), ‘राशि खन्ना’ (Rashi Khanna) आणि ‘प्रिया भवानी शंकर’ (Priya Bhavani Shankar) यांनी अभिनय केला आहे.
थिरुचित्रंबलम या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रममध्ये (thiruchitrapalam movie Audio lanuch program) या दोन गायिका गाणं गात असताना राशि खन्नाही मंत्रमुग्ध झाली होती. अभिनेता धनुषही या दोघंचं गाणं ऐकून अवाक् झाला.
हे गाणं एकदा ऐकलं की आपण सतत ऐकत राहतो. या दोघींचा आवाज आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. या दोघींच्या आवाजाने सध्या सोशल मीडियासोबत ऐकणाऱ्या प्रत्येकावर जादू केली आहे. सोशल मीडियावर बघावं त्या अकाऊंटवर हे गाणं शेअर करण्यातं आलं आहे. तर कंमेट्मध्ये यूजर्स या गाण्याचं नाव, चित्रपटाचं नाव विचारत आहेत. अगदी या दोघींच्या आवाजाची निशा चढल्याचं एका यूजर्सचं म्हणं आहे.