शहीदांना श्रद्धांजली, आमिर-रणबीर-आमिताभ आले एकत्र

सीआरपीएफने रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह  गाणे चित्रीत केले आहे.

Updated: Apr 19, 2019, 01:35 PM IST
शहीदांना श्रद्धांजली, आमिर-रणबीर-आमिताभ आले एकत्र title=

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली. या दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहूती दिली. १४ फेब्रुवारी रोजी 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेकडून हा भ्याड हल्ला घडविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर शहीदांना श्रध्दांजली देण्यासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. सीआरपीएफने बॉलिवूडकरांसह हे गाणे चित्रीत केले आहे. 

सीआरपीएफने रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह हे गाणे चित्रीत केले आहे. ''तू देश मेरा'' असे या गाण्याचे शिर्षक आहे. सीआरपीएफने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सीआरपीएफने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनी ''तू देश मेरा'' या गाण्यासाठी उल्लेखनिय काम केले आहे. हे गाणे पुलवामा हल्ल्यामध्ये आपल्या प्रणाची आहूती देणाऱ्या जवानांना हे गाणे समर्पित करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर देशाचे वातावरण फार तापले होते. या कठिण काळात अनेक कलाकारांनी शहीद जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तनी कलाकारांवर भारतात काम करण्यास बंदी घातली होती.