आश्रमच्या बबीता भाभीचा बोल्ड डान्स, VIDEO आला समोर

आश्रमच्या बबीता भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, आतापर्यतचा सर्वांत बोल्ड डान्स आला समोर, VIDEO पाहिताल का तुम्ही?

Updated: Oct 21, 2022, 05:11 PM IST
आश्रमच्या बबीता भाभीचा बोल्ड डान्स, VIDEO आला समोर  title=

मुंबई : आश्रम (Aashram) या बहूचर्चित वेबसीरीजमधून चर्चेत आलेली बबीता भाभी अर्थात त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिचा एक डान्सचा व्हिडिओ (Dance Video) समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. 

अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) आश्रय (Aashram) या वेब सीरिजमध्ये 'बबिता' ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तसेच त्रिधा तिच्या ग्लॅमरस शैलीसाठीही ओळखली जाते. आता त्रिधा चौधरीचा (Tridha Choudhury) एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओत ती दिवाळी पार्टीमध्ये डान्स करताना दिसली आहे. या व्हिडिओची एकच चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय? 

व्हिडिओमध्ये त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) दिवाळी पार्टीत खूप मस्ती करताना दिसली आहे. या व्हिडिओत ती रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'बलम पिचकारी' गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओत ती भन्नाट डान्स करताना दिसली आहे.  

लूकची चर्चा 

त्रिधा चौधरीच्या (Tridha Choudhury) लूकबद्दल बोलायचे झाले तर व्हिडिओमध्ये ती ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. खुले केस आणि सूक्ष्म मेकअपमध्ये त्रिधाची स्टाइल अप्रतिम दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

दरम्यान दिवाळीत होळीच्या गाण्यांवर त्रिधा (Tridha Choudhury) नाचताना पाहून सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. तर काही युझर्सना त्रिधाचा डान्स आवडला आहे. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. 

आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये त्रिधाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. तिचे काम प्रेक्षकांनाच खुपच आवडले होते. आता आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्येही त्रिधा (Tridha Choudhury) दिसणार आहे, नव्या सीझनच्या ट्रेलरमध्ये त्रिधा पुन्हा त्याच जबरदस्त स्टाइलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सीझनची उत्सुकता लागली आहे.