ACTRESS SHREEDEVI DEATH: श्रीदेवी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे कि आजही तिच्या अभिनयाचे दिवाने आहे बालकलाकार म्हणू श्रीदेवीनी आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती दमदार अभिनय, नृत्यपारंगत आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर असा चेहरा त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता कमवली.
कुठलीही भूमिका असो श्रीदेवी त्या अगदी सहज साकारत असो मग ती चुळबुळी मुलगी असो किंवा गंभीर भूमिका असो ... श्रीदेवी यांनी इंग्लिश विंग्लिश सिनेमातून पुन्हा पदार्पण केलं होत आणि हा सिनेमा खूप हिट झाला.
त्यानंतर त्यांनी मॉम सिनेमात काम केलं त्या सिनेमाचं प्रमोशन च काम उरकून त्या कुटुंबातील एका लग्नासाठी दुबईला पती बोनी कपूरसोबत गेल्या आणि त्यांनतर दुःखद बातमी समोर आली ती श्रीदेवी यांच्या निधनाची आणि संपुर्ण बॉलीवूड सृष्टी हादरून गेली. नुकतंच लेखक सत्यार्थ नायक यांनी आपल्या “श्रीदेवी इटरनल गॉडेस'(SHRIDEVI ITERNAL GODDES) या पुस्तकात त्यांच्या मृ’त्यूच्या रहस्याचा उलगडा केला आहे.
सत्यार्थ नायक यांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे की, सुरुवातीपासूनच श्रीदेवी याना बीपीचा आजार होता. त्यामुळे अनेकवेळा त्या चक्कर येऊन पडत असे. पराशर आणि नागार्जुन यांच्या सोबतच्या एका सिनेमामध्ये श्रीदेवी बाथरूममध्येच चक्कर येऊन पडल्या होत्या. श्रीदेवी यांचा भाचा माहेश्वरी यांनी सांगितले की, एक दिवस त्या अचानक फरशीवर चक्कर येऊन पडल्या होत्या. इतकंच काय तर त्यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त देखील येत होते.
एक वेळा बोनी कपूर सोबत कार्यक्रमामध्ये असताना, त्यांना चक्कर आली होती. तेव्हा बोनी कपूर बाजूला होते म्हणून त्यांनी, श्रीदेवील खाली पडू नाही दिल. मात्र दुबईच्या त्या हॉटेलच्या बाथरूममध्ये जेव्हा श्रीदेवी प’डल्या त्यावेळी बोनी कपूर तिथे नव्हते.हॉटेलमध्ये अंघोळीला जात असताना पडल्या. आणि दुर्दैव म्हणजे त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.