SONALI PHOGAT प्रकरणात नवीन VIDEO समोर..सुधीर सांगवान जबरदस्ती पाजतोय ड्रिंक..व्हिडीओने एकच खळबळ

टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्यातील कर्ली क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Aug 28, 2022, 07:37 AM IST
SONALI PHOGAT प्रकरणात नवीन VIDEO समोर..सुधीर सांगवान जबरदस्ती पाजतोय ड्रिंक..व्हिडीओने एकच खळबळ  title=

Sonali Phogat Viral Video: टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्यातील कर्ली क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

यासोबतच पोलिसांनी क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले आहेत. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. फोगट यांचे पीए सुधीर सांगवान, कर्ली क्लबचे मालक सुखविंदर सिंग आणि ड्रग्ज विक्रेता पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता या प्रकरणात कोणतं नवीन वळण लागेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

कर्ली क्लबच्या मालकाला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपानंतर सुधीर आणि सुखबिंदरला अटक केली. सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी 22 ऑगस्टला फोगट यांच्यासोबत गोव्यात पोहोचले होते. प्रत्यक्षात सोनालीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते.

दरम्यान, सोनाली फोगट यांच्या मृत्यूविषयी नवनवीन खुलासे समोर येत आहेत काही सीसीटीव्ही फुटेजेस समोर येऊ लागले आहेत  सर्वात आधी एक फुटेज समोर आलं ज्यात सोनाली फोगट आपल्या सहकाऱ्यांसोबत  दिसत आहेत ,त्यांनतर दुसरं व्हिडीओ समोर आला ज्यात सोनाली फोगट यांची अवस्था फार गंभीर दिसत होती त्यांचासहकारी त्यांना आधार देत घेऊन चालताना दिसला तर आता या प्रकरणात आणखी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे . 

ज्यामध्ये सोनाली फोगट यांची अवस्था अतिशय वाईट दिसतेय त्यांना चालणंसुद्धा कठीण होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. 

अंजूना क्लबच्या सीसीटीवी फुटेज मधून हा व्हिडीओ सापडला आहे जो सोशल मीडियावर सध्या खूप शेर सोनाली फोगाट सुधीर सांगवानसोबत डान्स करताना दिसत आहे यात मुख्य बाब अशी की डान्स करताना सुधीर सांगवान तिला जबरदस्ती पाणी पाजताना दिसतोय प्यायल्यानंतर लगेचच त्यांनी ते पाणी थुकून टाकल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे . 

पोस्टमार्टम अहवालानंतर  सोनाली फोगट यांचा मृत्यू सिंथेटिक दृगच्या अतिसेवनामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता या व्हिडिओच्या समोर येण्याने या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे ..