आई झाल्यानंतर धनश्री काडगावकरने शेअर केली मजेशीर पोस्ट

थोडं वाईट वाटलं मला...पण निदान मी त्यात बसले, मी त्यात फिट झाले या भावनेने परत आनंद झाला..  

Updated: Jun 25, 2021, 09:39 PM IST
आई झाल्यानंतर धनश्री काडगावकरने शेअर केली मजेशीर पोस्ट  title=

प्रेरणा कोरगांवकर, मुंबई |  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील वहिणीसाहेबांच्या भूमिकेमुळे घराघराता पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावरील एकापेक्षा एक अशा हटके पोस्टमुळे कमालीची चर्चेत असते. धनश्री आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. 

धनश्रीने 2021 च्या सुरुवातीला एका गोंडस बाळाला जन्म दिला.. आणि त्यानंतर धनश्रीची बाळाला सांभाळण्याची कसरत सुरु झाली.  त्यामुळे धनश्री काही काळ सोशल मीडियापासून देखील लांब होती. 
पण आता बाळाला सांभाळायाची कसरत करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही ना काही नवं आणि हटके पोस्ट करताना दिसते.

नुकतेच धनश्रीने आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत आपल्याला जुन्या जीन्स आता अगदी बरोबर बसत असल्याचं म्हटलंय.. फोटोच्या कॅप्शनमध्ये धनश्री लिहिते,
"बर तर आज finally मला माझी एक जुनी जीन्स बसली बाबा...

बसली म्हणजे, कशी तरी का होईना बसली...घट्ट बसली...चार फोटो क्लिक केल्या केल्या change करावी लागली इतकी घट्ट... थोडं वाईट वाटलं मला...पण निदान मी त्यात बसले, मी त्यात फिट झाले या भावनेने परत आनंद झाला.."
पुढे धनश्री लिहिते, "जवळ जवळ 13 महिने झाले जीन्स घालून (तसं प्रेग्नेन्सीच्या जीन्स मी घातल्या पण नॉर्मल जीन्स ती नॉर्मल जीन्स ना)

"मला माहिती आहे लवकरच माझे जुने कपडे मला बसणार आहेत, तो पर्यंत प्रेग्नन्सीवाले ढगळे कपडे घालून घेणार मी..
PLEASE NOTE - हा प्रवास फक्त बारीक होण्याबद्दल नाही तर पूर्वपदावर येण्या बद्दल आहे.."

एकूणच काय तर तर स्क्रिनवर पुन्हा कमबॅक करण्याची तयारी धनश्रीने  जोरात सुरु केलीये असंच दिसतंय..