Tumbbad Advance Booking: बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची छाप वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनातून जात नाही. या चित्रपटांच्या यादीत 'तुंबाड'चे देखील नाव आहे. सोहम शाहचा 'तुंबाड' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6 वर्षे झाली आहे.
6 वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आज 'तुंबाड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच एक विक्रम करायला सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, 'तुंबाड' या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये प्रचंड कमाई केली आहे.
एका रात्रीत 13 हजार तिकीटांची विक्री
आतापर्यंत 'तुंबाड' चित्रपटाची जवळपास 13 हजार तिकिटे एका रात्रीत विकली गेली आहेत. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सुमित कंडेल यांच्या मते, 'तुंबाड' या चित्रपटाने 13 हजार तिकिटे विकण्याचा विक्रम केला आहे. PVR आणि INOX मध्ये आतापर्यंत 9,200 तिकिटे विकली गेली आहेत. सिनेपोलिसने जवळपास 3,800 तिकिटांची विक्री करून सर्वांना चकित केले आहे. 'तुंबाड' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक देखील खूप खूश आहेत. आगाऊ बुकिंग हा याचा पुरावा आहे.
FANTASTIC advance bookings for Tumbbad! National chains buzzing with over 13,000 tickets sold. PVR & INOX lead the way with 9,200 tickets, Cinepolis not far behind with 3,800. The excitement is REAL!#Tumbbad @BarveRahi @s0humshah pic.twitter.com/Q8jrLEPem6
— Sumit Kadel (@SumitkadeI)
'तुंबाड' चित्रपटाची कथा
'तुंबाड' हा चित्रपट तीन भागात विभागला गेला आहे. या चित्रपटाची कथा 1918 पासून सुरू होते. हा चित्रपट विनायक राव (सोहम शाह) ची कथा सांगतो. जो आपल्या आई आणि भावासोबत महाराष्ट्रातील 'तुंबाड' गावात राहतो. अनेक वर्षांपासून या गावात खजिना लपल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे विनायक आणि त्याची आई या खजिन्याचा शोध घेतात. मोठा झाल्यावर विनायक हा खजिना शोधण्यासाठी निघतो. विनायक आता या खजिन्यापर्यंत कसा पोहोचतो हे या चित्रपटात अतिशय रोमांचक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.