बॉक्स ऑफिसवर 'तुम्हारी सुलु'ची दमदार कमाई

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा तुम्हारी सुलु हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झालाय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. 

Updated: Nov 19, 2017, 05:23 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'तुम्हारी सुलु'ची दमदार कमाई title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा तुम्हारी सुलु हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झालाय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्विटररवरुन तुम्हारी सुलुच्या कमाईचा आकडा जाहीर केला. पहिल्या दिवशी या सिनेमाने २.८७ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ४.६१ कोटी रुपये कमावले. दोन दिवसांत या सिनेमाने ७.४८ कोटी रुपयांची कमाई केली. 

या सिनेमातील कथा मुंबईत राहणारी गृहिणी सुलोचना अर्थात सुलु(विद्या बालन) हिच्या भोवती फिरते. सुलुचे छोटेसे कुंटब आहे. यात तिचा नवरा अशोक(मानव कौल) आणि तिचा लहान मुलगा आहे. 

सगळ्यांप्रमाणेच तिच्याही काहीतरी इच्छा आकांक्षा आहेत. सुलुला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतात. एके दिवशी तिचे आयुष्य अचानक बदलते आणि तिला रेडिओवर काम करण्याची संधी मिळते. रेडिओवर तिला लेट नाईटमध्ये शो करण्याची संधी मिळते. सिनेमाचे नाव तुम्हारी सुलु असे आहे आणि नावाप्रमाणेच सुलुभोवतीच कथा फिरते.