दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली 'ही' टीव्ही अभिनेत्री

अभिनेत्रीच्या दारी बॅण्ड, बाजा, बारात

Updated: Feb 11, 2020, 12:00 PM IST
दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली 'ही' टीव्ही अभिनेत्री title=

मुंबई : 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेलली अभिनेत्री काम्या पंजाबी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे. मुंबईत तिने पुन्हा तिच्या आयुष्याला सुरूवात केली. वयाच्या ४०व्या वर्षी तिने शलभ डांगसोबत लग्न केले. तीन दिवसांपासून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आता काम्याने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Made for each otherBeautiful bothshalabhdang @panjabikamya . . . . . . . . #kamyapunjabi #kasha #shubhmangalkasha #shalabhdang #beauty #bride #sweetcouple #relationshipgoals #couplegoals#explore #red #beautiful #kamyapanjabi #kpismagic

A post shared by kp&ShD"are_magi(@kamya.aara) on

लाल रंगाची गडद छटा असलेल्या लेहेंग्यामध्ये आणि नव्या नवरीच्या रूपात काम्या फार सुंदर दिसत आहे. तर शलय देखील नवऱ्या मुलाच्या रूपात उठावदार दिसत आहे. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. त्याच दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढली.

'पुन्हा एकदा लग्न करणं माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती. त्यामुळे याबाबत मी पूर्णपणे विचार केला. एकदा लग्न तुटल्यानंतर पुन्हा प्रेम करण्याची कल्पना कठीण होती. एक वेळ अशी आली की मी, लग्नाच्याविरोधातच होती. पण शलभने पुन्हा एकदा लग्न आणि प्रेमावरील माझा विश्वास जागृत केला. मी एका १६ वर्षांच्या मुलीसारखी झाली आहे जी, पूर्णपणे प्रेमात आहे' अशी भावना काम्याने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. 

तर, शलभचा देखील हा दुसरा विवाह आहे. काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा १० वर्षांचा मुलगा आहे.याआधी काम्याचा विवाह बंटी नेगी या व्यावसायिकाशी झाला होता. परंतु २०१३ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.