....म्हणून जान्हवीला करावी लागली पायपीट

३५०० पायऱ्या चढत तिने हा प्रवास पूर्ण केला 

Updated: Feb 11, 2020, 11:12 AM IST
....म्हणून जान्हवीला करावी लागली पायपीट
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या आगामी चित्रपट आणि नवनवीन लूकसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र ही अभिनेत्री एका अशा कारणामुळे चर्चेत आली आहे, जे पाहता अनेकांनी तिची प्रशंसा करण्यासही सुरुवात केली आहे. 
पायात चप्पलही न घालता जान्हवीने तब्बल १२ किमीचा प्रवास केला आहे. लोकप्रियता, प्रसिद्धीच्या या झोतात जान्हवीची ही साधी राहणी अनेकांची मनं जिंकतेय. आधुनिक विचारसरणीचा विचार करत असतानाही, जान्हवीने देवाप्रती असणारी तिची आस्था तसूभरही कमी होऊ दिलेली नाही. 

सोमवारीच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिच्या या अनोख्या प्रवासाविषयी माहिती दिली. व्यंकटेश्वराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जान्हवी तिरुमला तिरुपती मंदीर येते पोहोचली. या प्रवासातील काही फोटोसुद्धा तिने शेअर केले. तिचा हा प्रवास जरा जास्तच खास होता, कारण ३५०० पायऱ्या चढत तिने देवाचं दर्शन घेण्य़ासाठी १२ किलोमीटरचा प्रवास पायी केला. 

 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

चाहत्यांची आणि छायाचित्रकारांची गर्दी या साऱ्यापासून दूर असणाऱ्या जान्हवीने यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. ज्याला पिवळ्या रंगाच्या ओढणीची जोड तिने दिली होती. अतिशय सोबर असा तिचा हा लूकसुद्धा चाहत्यांची मनं जिंकून गेला. बॉलिवूड अभिनेत्री म्हणून नावारुपास येत असतानाच जान्हवीमध्ये दडलेली एक निरागस मुलगी अशा प्रसंगी हळऊन डोकावत असल्याचं म्हणत पुन्हा एकदा तिने आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

तिरुपती तिरुमला मंदिरात जाण्याची जान्हवीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिने या मंदिराला भेट दिली होती. तिच्या आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर, हल्लीच तिने 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. याशिवाय 'दोस्ताना', 'रुही अफजाना' आणि 'तख्त' या चित्रपटांच्या चित्रीकरणात ती येत्या काळात व्यग्र असेल.