'या' अभिनेत्रींची चौकशी करणारे एनसीबीचे २ अधिकारी निलंबित

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे.     

Updated: Dec 3, 2020, 11:16 AM IST
'या' अभिनेत्रींची चौकशी करणारे एनसीबीचे  २ अधिकारी निलंबित title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील ड्रग्स प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. त्यामुळे अनेक कलाकारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं देखील समोर आलं. याप्रकरणी एसीबी कसून चौकशी करत आहे. तर दुसरीकेडे एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिष्मा प्रकाश  यांची चौकशी करणाऱ्या दोन एसीबी अधिकाऱ्यांना नलंबित करण्यात आलं आहे. 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरम्यान भारती सिंह आणि तिचा पती हर्षला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. 

मात्र, जामीनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी हवं तसं काम केलं नाही. न्यायालयात देखील उपस्थित न राहीले नाहीत शिवाय आरेपींना मदत केल्याचा देखील त्यांच्यावर संशय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात असून याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येणार आहे.