Sonali Phogat हत्येसाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी! प्रकरणाला वेगळं वळण

Sonali Phogat हत्या प्रकरणात दोन धक्कादायक पत्र समोर, हत्येसाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी आणि...   

Updated: Oct 10, 2022, 01:30 PM IST
Sonali Phogat हत्येसाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी! प्रकरणाला वेगळं वळण title=

Sonali Phogat Death : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचा  हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात (goa) मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं, मात्र मात्र त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. शवविच्छेदनानंतर सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.  (sonali phogat latest news)

नुकताच सोनाली फोगट यांच्या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. सोनाली फोगट यांच्या कुटुंबाला दोन निनावी पत्रे मिळाली असून त्या दोन पत्रांचा हत्येशी संबंधित व्यवहार समोर आले आहेत. (Two shocking letters)

या दोन पत्रांमुळे सोनाली फोगट यांच्या हत्येच्या तपासाला वेगळी कलाटणी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे. सोनाली फोगट यांचा मेहुणा (sonali phogat brother in law ) अमन पुनिया यांनी पत्राची माहिती दिली आहे. पत्रांची चौकशी होणं महत्त्वाचं असल्याचं देखील अमन पुनिया यांनी सांगितलं आहे. (sonali phogat bjp)

अमन पुनिया यांच्या म्हणण्यानुसार, एका पत्रातून सोनाली फोगटच्या हत्येशी संबंधित व्यवहार उघड झाले आहेत. सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी 10 कोटी रुपयांची डील झाल्याचं या पत्रातून समोर येत आहे. या हत्या प्रकणात मोठ्या नेत्याचं नाव समोर आल्याचं देखील सांगितलं जात आहे.  (sonali phogat last video)

सोनाली यांच्या मेहुण्यान्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ( sonali phogat case)  त्यांना दोन्ही पत्रे खूप अंतराने मिळाली आहेत. कारण जिथे त्यांना पहिले पत्र 1 महिन्यापूर्वी मिळालं, तर दुसरं पत्र काही दिवसांपूर्वीच मिळाले आहे. त्यामुळे दोन पत्रांमुळे कोणतं सत्य समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.