शर्टची बटणं उघडून उर्फी जावेदचे ठुमके...त्यानंतर नको तेच घडलं

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमीच विचित्र स्टाईल करून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

Updated: May 5, 2022, 08:00 AM IST
शर्टची बटणं उघडून उर्फी जावेदचे ठुमके...त्यानंतर नको तेच घडलं title=

मुंबईः उर्फी जावेद ही नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. तिच्या बोल्ड लूकने नेहमीच ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. मात्र यावेळी उर्फीने असं काही केलंय की तिचे चाहते घायाळ झाले आहेत. 

उर्फीने शर्टची बटणं उघडून डान्स केला आणि सर्वांचाच श्वास रोखून धरला. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मस्त स्टाईलमध्ये डान्स करत आहे, तोही रणवीर सिंगच्या गाण्यावर.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने या व्हिडिओमध्ये जांभळ्या रंगाच्या प्लाझो पँट आणि जांभळ्या रंगाचा सॅटिन शर्ट घातलेला दिसत आहे. शर्टची बटणं उघडून तिनं ग्लॅमरस लूकमध्ये डान्स केला आहे. हा लूक सुद्धा तिच्या चाहत्यांना आवडला आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमीच विचित्र स्टाईल करून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे.

ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे हेडलाईन्समध्ये असते. अभिनेत्री कायम स्वतःचे असे फोटो शेअर करत असते, ज्यामुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र उर्फीवर या ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. ती तिची स्टाईल कायम ठेवते आणि चर्चेत राहते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x