कपडे नाही तर साखळीनं अंग झाकून हॉटेलमध्ये शिरली ही अभिनेत्री, पाहाणारे हादरलेच

फॅशनच्या नावाखाली या अभिनेत्रीचं जे चाललंय ते पटतंय का?

Updated: Mar 10, 2022, 07:54 PM IST
कपडे नाही तर साखळीनं अंग झाकून हॉटेलमध्ये शिरली ही अभिनेत्री, पाहाणारे हादरलेच title=

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल्स आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करून आपले अपडेट्स देत असतात. अनेक चाहते त्यांना फॉलोही करत असतात. बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड स्टाईलसाठी एक अभिनेत्री प्रसिद्ध आहे. कधी विना ब्लाऊज तर कधी नेटचे कपडे तर कधी आंतर्वस्त्राशिवाय नुसत्या शॉर्ट टॉपवर केलेल्या फोटोशूटमध्ये चर्चेत असते. कधी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. 

आतापर्यंत तुमच्याही लक्षात आलं असेलच की कोणालबद्दल सांगत आहोत. अर्थातच स्टाईल आणि फॅशन क्वीन उर्फी जावेद सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. काहीजण तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोल देखील करत आहेत. यावेळी उर्फीनं स्टाईलची हद्द पार केली. 

उर्फीची अजब फॅशन स्टाईल पाहून तुम्हीही एक क्षण डोक्यावर हात मारून घ्याल. उर्फीची स्टाईल पाहून सर्वजण अवाक झाले. तिच्या स्टाईलमुळे काहींना धक्काच बसला. 

या फोटोमध्ये पाहू शकता की उर्फीनं गळ्याभोवती साखळी बांधून स्टाईल केली आहे. यामध्ये तिने आंतर्वस्त्र न वापरता साखळीनं शरीर झाकलं आहे. या साखळीमध्ये वेगवेगळ्या रंगाची कुलपं दिसत आहेत. उर्फीला या लूकमधून नेमकं काय दाखवयाचं आहे हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र तिच्या या लूकवर सध्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. 

उर्फीनं टॉपच्या जागी साखळीनं अंग झाकून घेतलं आहे. त्यासोबत तिने जाळीदार स्कर्ट परिधान केला आहे. तिच्या या आऊटफीटवर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर काहींनी या लूकला लाईक केलं आहे.