संजय दत्तनंतर उर्वशी रौतेलाला UAE चा Golden Visa, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे

कलाकारांना हा व्हिसा देणे आता सुरू करण्यात आले आहे.

Updated: Sep 30, 2021, 08:12 PM IST
संजय दत्तनंतर उर्वशी रौतेलाला UAE चा Golden Visa, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं जे सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत, आता अभिनेत्रीला संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE चा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. स्वतः अभिनेत्रीने ही माहिती तिच्या सर्व चाहत्यांसोबत तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. गोल्डन व्हिसाचा अर्थ असा आहे की आता उर्वशी रौतेला पुढील 10 वर्षे यूएईमध्ये राहू शकते. 

यापूर्वी हा व्हिसा व्यावसायिक पुरुष आणि गुंतवणूकदारांना तसेच डॉक्टर आणि इतर तत्सम व्यवसायातील लोकांना देण्यात आला होता. जिथे आता त्याची मागणी लक्षात घेता कलाकारांना हा व्हिसा देणे आता सुरू करण्यात आले आहे.

ही आनंदाची बातमी शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर लिहिले की, "मी फक्त 12 तासात 10 वर्षांसाठी हा सुवर्ण व्हिसा मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी स्वर्ण निवास या अद्भुत ओळखीबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. युएई सरकार, राज्यकर्ते आणि जनतेला माझ्या शुभेच्छा.” 

अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तलाही हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिताना ही माहिती दिली.

यूएईचा गोल्डन व्हिसा म्हणजे दुबईमध्ये 10 वर्षांचा रहिवासी परमिट आहे. गोल्डन व्हिसा पहिल्यांदा 2019 मध्ये सुरु करण्यात आला. त्याची सुरुवात महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईचे शासक यांनी गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी केली होती.

गोल्डन व्हिसा देण्यामागील देशांचा हेतू गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आहे. 'रेसिडेंट बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम' अंतर्गत नागरिक गोल्डन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर, देश व्हिसा मागणाऱ्या कागदपत्रांची छाननी करतो.

उर्वशी गेल्या काही दिवसांपासून भारतात राहत असताना रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजचे शूटिंग करत होती, त्यानंतर ती आता तिच्या पुढील म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी दुबईला पोहोचली आहे. आज, अभिनेत्रीची सोशल मीडियावरही मजबूत फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर 41 दशलक्ष युजर फॉलो करतात.