अरे बापरे... उर्वशी रौतेलानं कॅमेरासमोर काढलं जॅकेट आणि.... 

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Updated: Sep 6, 2021, 08:16 PM IST
अरे बापरे... उर्वशी रौतेलानं कॅमेरासमोर काढलं जॅकेट आणि....  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. ती तिच्या आयुष्याविषयीची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसंदर्भात ती ट्रोर्लसच्या निशाण्याखाली आली आहे. तर काही चाहते तिच्या लूकचं कौतुक करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना उर्वशी रौतेलाने लिहिलं, ''आर. बी. एफ.(रेस्टिंग ब्रेकफास्ट फेस)ची सीरिअस केस झाली आहे.'' यासोबत, तिने आपल्या कॅप्शनमध्ये अनेक हार्ट इमोजी आणि स्टार शेअर केले आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर स्पेन्सचं 'ब्रेकफास्ट चॅलेंज साँग' वाजत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी आउटफिट चेंज करताना दिसत आहे.  व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, ती एका ट्रायल रूममध्ये आहे. तिने प्रिंटेड मिनी स्कर्ट आणि ब्रलेट घातलं आहे.  त्यावर ती गुलाबी रंगाचं जॅकेट ट्राय करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशी रौतेला एक फॅशनिस्टा आहे. ती अनेकदा तिचा पब्लिक अपीयरेंस  खास पद्धतीने खास अंदाज सादर करताना दिसते. ती स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआउट देखील करते. ती फिटनेस फ्रिक देखील आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर उर्वशी 'व्हर्जिन भानुप्रिया' मध्ये दिसली होती. ती लवकरच 'ब्लॅक रोज' या चित्रपटातून तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.