त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा

Nitin Gadkari Big Announcement: उपराजधानी नागपूरमध्ये नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आधीच्या रक्कमेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दिली जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2025, 10:16 AM IST
त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा title=
गडकरींनी केली घोषणा (प्रातिनिधिक फोटो)

Nitin Gadkari Big Announcement: नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे. 

नेमकं काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरींनी या नव्या धोरणाबद्दल बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे. यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, "केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे," अशी माहिती दिली. 

लागू केलं नवं धोरण

अपघाग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2021 पासून रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे. भीषण अपघातामधील जखमींना तातडीची मदत करुन त्यांचे प्राण वाचवणाऱ्यांना, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत बक्षीस स्वरुपात ठराविक निधी दिला जाणार असं निश्चित करण्यात आलेलं. तेव्हा ही रक्कम 5 हजार रुपये इतकी होती. ज्यामध्ये आता वाढ करुन ती 25 हजार इतकी करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> पुणेकरांना महिंद्रांकडून 4500 कोटी रुपयांचं गिफ्ट! आता 500 रोबोट्स असलेला...

कोण असतो 'गुड स्मार्टीयन'?

केंद्र सरकारच्या या मदतनीसांना आर्थिक स्वरुपाची शब्बासकीची थाप देण्याच्या योजनेला 'गुड स्मार्टीयन' असं नाव देण्यात आलं आहे. "चांगल्या विचाराने आणि कोणत्याही मोबदल्याचा अथवा बक्षिसाचा विचार न करता, कोणतंही खास नातं नसताना स्वयंप्रेरणेनं पुढाकार घेत अपघातात जमखी झालेल्यांना मदत करतो," अशी 'गुड स्मार्टीयन'ची व्याख्या करण्यात आली आहे.

चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या

दरम्यान, सोनमर्गमधील झेड-मोर्च बोगद्याच्या कामाच्या भूमीपुजन सोहळ्यानंतर नितीन गडकरींनी, "आपल्या देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करायला हवी. पाणी, ऊर्जा, परिवहन आणि संवाद या गोष्टींशिवाय विकास, उद्योग, पर्यटन आणि व्यापार वाढवता येणार नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी आमच्याकडे जम्मू-काश्मीरला अधिक सधन, श्रीमंत आणि विकसित करण्यासाठी हा प्रकल्प सोपावला आहे. उद्योजक आणि व्यवसायिकांनी जम्मू-काश्मीरला अधिक आनंदी, सधन आणि श्रीमंत बनवायला हवं, असा आमचा उद्देश आहे. म्हणूनच आम्ही ही विकासकामं हाती घेतली आहेत," असं सांगितलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x